शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आपले यश समाजासाठी उपयुक्त असावे, MPSCत मुलींमध्ये पहिल्या येणाऱ्या सविता गर्जेच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 23:59 IST

सानपाडा येथे राहणाऱ्या सविता मारुती गर्जे (२६) हिने एमपीएससीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये सानपाडा येथील सविता गर्जे हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ती पोलीस उपअधीक्षक पदासाठी पात्र ठरली आहे, परंतु आपले ध्येय केंद्रीय लोकसेवा आयोग असून, त्यासाठीचीही तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले आहे.सानपाडा येथे राहणाऱ्या सविता मारुती गर्जे (२६) हिने एमपीएससीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश मिळविण्यासाठी ती सलग तीन वर्षे कुटुंबापासून दूर पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. आपले यश केवळ स्वत:पुरते नसावे, तर ते समाजासाठीही उपयुक्त असावे. याच भावनेतून आपण कतव्याशी प्रामाणिक राहणार असल्याचीही भावना तिने व्यक्त केली. वडील मारुती गर्जे हे बेस्टमध्ये कुलाबा डेपोत क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. आई गृहिणी असून, लहान भाऊ व बहीण शिक्षण घेत आहेत. सानपाडा येथील स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बारावीनंतर तिने बॅचलर आॅफ फार्मसी केली, परंतु परीक्षेच्या निकालापूर्वी हातात नोकरी असतानाही ती न स्वीकारता स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. या दरम्यान यशाच्या मार्गातले अडथळे जाणून घेऊन अभ्यास हाच उपाय असल्याचे तिला ज्ञात झाले होते. त्यानुसार, सोशल मीडियापासून अलिप्त राहून मोबाइलचा वापर केवळ वाचनासाठी करून तिने एमपीएससी परीक्षेत यश संपादित केले.एमपीएसी परीक्षा देताना उपजिल्हाधिकारी होण्याची इच्छा असताना, इतरही उपलब्ध पर्यायांबाबत तिचा संभ्रम होता. या दरम्यान ती काही पोलीस अधिकाऱ्यांना भेटली असता, पोलीस उपअधीक्षक पदाबाबत तिची उत्सुकता वाढली. कामाचा ताण व अनियंत्रित वेळ, यामुळे महिलांकडून फारसे या पदाकडे उत्सुकतेने पाहिले जात नाही, परंतु उपअधीक्षक झाल्यास महिलांवर होणाºया अत्याचार विरोधात कायदेशीर लढण्याचा अधिकार आपल्याला मिळेल, या भावनेतून तिने या पदाला प्राधान्य दिले. अंतिम परीक्षेत नेमकी याच पदासाठी तिची निवड झाली.परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात ३ लाख ८० हजार परीक्षार्थी होते. त्यामधून दुसºया टप्प्यात ४ हजार जणांची निवड झाली असता, अंतिम मुलाखतीला १ हजार ३०० परीक्षार्थी पात्र ठरले होते. त्यामधून रिक्त पदांसाठी ४०० जणांची निवड झाली असता, त्यात सवितानेही बाजी मारली.>केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे आपले मुख्य ध्येय असून, त्यासाठी एमपीएसी ही महत्त्वाचा आधार ठरणार असल्याची भावना सविता गर्जेने व्यक्त केली. त्याचीही तयारी तिने सुरू केली आहे. कोणतीही परीक्षा देताना सर्वात मोठे आव्हान हे आपली इच्छाशक्ती असते. अभ्यासातही आवडीचा पर्याय न ठेवता सर्वच विषयांचे ज्ञान मिळवत गेल्यास यशाचा मार्ग अधिक सोपा होतो. याच जिद्दीच्या जोरावर तिने स्वत:सह कुटुंबाचे व नवी मुंबईचे नाव उज्ज्वल केले आहे.