शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

चळवळीमुळेच स्वच्छतेत यश; देशात तिसऱ्या क्रमांकावर झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:17 IST

लोकसहभाग वाढविण्यास दिले प्राधान्य

नवी मुंबई : स्वच्छता सर्वेक्षण २०२० च्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये नवी मुंबईने राज्यात प्रथम व देशात तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या तीनमध्ये येण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, हा क्रमांक टिकविण्यासाठी महापालिकेने स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले आहे. लोकसहभाग वाढविण्यावरही लक्ष दिले असून, प्रत्येक नागरिकाने या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा व अंतिम स्पर्धेत तिसरा किंवा अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.स्वच्छ भारत अभियानामध्ये गतवर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने देशात सातवा क्रमांक मिळविला होता. २०२० च्या अभियानामध्ये पहिल्या तीनमध्ये नंबर मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी काम सुरू केले असून, पहिल्या सहा महिन्यांमध्ये त्याला यश आले आहे. शासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या लीगची सुरुवात केली आहे. पहिल्या दोन तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये नवी मुंबईने सातव्या क्रमांकावरून थेट तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. अभियानामधील ही कामगिरी लक्षवेधी आहे. यावर्षीसाठीची अंतिम स्पर्धा अद्याप बाकी आहे.पहिल्या सहा महिन्यांमध्ये महापालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत समजून शाळांमध्ये चित्रकला, निबंध व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात प्रशासनास यश आले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छ सोसायटी स्पर्धा आयोजित केली आहे. ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्या सोसायट्यांची माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.स्पर्धेदरम्यान शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या भिंती व संरक्षण भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रेखाटण्यात आले आहेत. चित्रांच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.घरामधील चप्पल व इतर कचरा संकलित करण्यासाठीची सुविधा निर्माण केली आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहांची संख्या वाढविण्याबरोबर आहेत त्यांची स्वच्छता चांगली राहील यावरही लक्ष केंद्रित केले आहे.झोपडपट्टी परिसरामध्येही जनजागृती केली आहे. महापालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या स्पर्धेला चळवळीचे स्वरूप मिळवून दिले आहे. यामुळेच पहिल्या सहा महिन्यांत तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. आता प्रशासन व लोकप्रतिनिधींपेक्षा नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. अंतिम स्पर्धेत तिसरा क्रमांक कायम ठेवण्यासाठी व अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.शहरात स्वच्छताविषयी सुरू असलेली कामेगृहनिर्माण सोसायटींच्या व इतर संरक्षण भिंतींची रंगरंगोटीरस्ते व दुभाजकांवर पांढरे, काळे व पांढरे पट्टे मारण्यास सुरुवातनागरिकांमध्ये स्वच्छता अभियानाविषयी जनजागृतीशाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजनझोपडपट्टी परिसरामध्ये विशेष जनजागृतीओला व सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यावर लक्ष केंद्रितपदपथांवर कचरा टाकण्यासाठी बिन्स बसविल्या आहेतप्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवण्यास प्राधान्यगृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्पर्धेचे आयोजनरुग्णालय, शाळा, हॉटेलचालकांचा सहभागही वाढविलाघरांमधील जुन्या चप्पल व इतर वस्तू संकलनासाठीही विशेष यंत्रणाचॉकलेटचे कागद व इतर छोटा कचरा संकलनासही प्राधान्यलोकसहभागाला विशेष महत्त्वस्वच्छता अभियानाच्या अंतिम स्पर्धेमध्ये लोकसहभागाला विशेष महत्त्व आहे. नागरिकांनी अभियानाविषयी फिडबॅक देणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांमध्ये किती जागरूकता निर्माण झाली आहे हे लक्षात येणार आहे. यामुळे स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेण्याबरोबर अ‍ॅपवरून प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे.केंद्राचे पथक देणार भेटअंतिम स्पर्धेदरम्यान जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारचे पथक नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे. पथक शहरातील स्वच्छताविषयी कामगिरीचा आढावा घेणार आहे. नागरिकांशीही संवाद साधून माहिती घेणार आहेत. यामुळे शहरवासीयांनी जास्तीत जास्त स्पर्धेत सहभाग घ्यावा व याविषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी.कचरा वर्गीकरणास हवे सहकार्यनागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगळा करावा. स्वच्छता अभियानामध्ये कचरा वर्गीकरणाला विशेष महत्त्व आहे. घरामधूनच कचºयाचे वर्गीकरण केले तर स्पर्धेमधील अव्वल क्रमांक टिकविण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांनी कचरा वर्गीकरणास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.स्वच्छता अभियानाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देशात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. आतापर्यंत सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. अंतिम स्पर्धेमध्येही हे यश कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे.- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महानगरपालिकास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पुढील काळात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने त्यांचे योगदान दिले तर नवी मुंबई पालिकेस अंतिम स्पर्धेतही यश मिळविला येईल.- तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा