शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, दिल्लीतल्या घटनेचे पडसाद, रायन इंटरनॅशनल शाळेवर पालक धडकणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:33 IST

दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरातील रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरातील रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी करूनही व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे.दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्याच्या हत्येचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शाळेच्या सीईओविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेच्या सर्वच शाळा व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. मात्र असा प्रकार इतर कुठे घडू नये याकरिता पालक आक्रमक झाले आहेत. याकरिता सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेविरोधात मंगळवारी पालकांचा मोर्चा निघणार आहे.सदर शाळा व्यवस्थापनाबाबत पालकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण होणे, शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभे करणे असे प्रकार शाळेत घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता शाळेत, वर्गात सीसीटीव्ही बसवावेत अशी पालकांनी यापूर्वीच मागणी केलेली आहे. परंतु शाळा व्यवस्थापन त्याचे गांभीर्य घेत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. दिल्ली येथील शाळेत असाच निष्काळजीपणा चिमुकल्या विद्यार्थ्याच्या जिवावर बेतल्याचाही पालकांचा आरोप आहे. यामुळे अशा प्रकारची दुसरी घटना घडू नये याकरिता शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी पालकांकडून शाळेबाहेर आंदोलन केले जाणार आहे.पनवेलमधील शाळेच्या छतावरून विद्यार्थी पडून मृत पावल्याची घटना गतवर्षी घडलेली आहे, तर नेरुळमधील शाळेतच शिक्षकाने अतिप्रसंग केल्याची तक्रार विद्यार्थिनीने केलेली आहे. सातत्याने घडणाºया अशा प्रकारांमुळे पालकांना शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची देखील चिंता सतावत आहे.ही बाब गांभीर्याने घेवून शिक्षण मंडळाकडून खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची सक्ती केली जावी, अशी मागणी होत आहे.गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात इयत्ता दुसरीत शिकणाºया प्रद्युम ठाकूरचा (७) मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाची निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून देशातील विविध भागात रायन इंटरनॅशनल शाळा प्रशासनाच्या विरोधात पालकांचा आक्र ोश पहावयास मिळत आहे. सोमवारी खारघर सेक्टर ११ मधील रायन शाळेमध्ये पालकांनी आंदोलन करीत शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी नगरसेवक अभिमन्यू पाटील, खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पालकांची समजूत काढत शाळा व्यवस्थापनाला लेखी पत्र दिले. खारघरमधील एकूण २२ शाळांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना खारघर पोलिसांच्या वतीने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांनी दिली.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलSchoolशाळा