शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:21 IST

कर्जतमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कर्जत : कर्जतसारख्या शैक्षणिक हब बनत असलेल्या तालुक्यातील विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तम गुण मिळवीत आहेत. त्या विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, मात्र त्यानंतर देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा भारतात परतावे, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने दहिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.तटकरे म्हणाले, कर्जत तालुक्यातील आमदार सुरेश लाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची २० वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. मधल्या काळात पाच वर्षे सुरेश लाड हे आमदार देखील नव्हते. मात्र विद्यार्र्थ्यांचे कौतुक करण्याच्या कार्यक्रमात कधी खंड पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीनंतर पुढे काय, यावर मार्गदर्शन मेळावेही आयोजित करण्यात येत आहेत.कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये येत आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे आणि पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे, मात्र परदेशात शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या देशात येऊन देशाचा आलेख कसा उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला ज्येष्ठ कार्यकर्ते वि. रा. देशमुख, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, अजय सावंत, रजनी गायकवाड, कांगणे, स्मिता पतंगे, हिराताई दुबे आदी प्रमुख उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४३ विद्यार्थ्यांचा तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या चार माध्यमिक शाळांचा विशेष सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत ९ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे