शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

विद्यार्थ्यांचा उपोषणाचा इशारा

By admin | Updated: November 18, 2016 03:59 IST

आग्रीपाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा द्वितीय सत्र जुलै २०१६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

नवी मुंबई : आग्रीपाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा द्वितीय सत्र जुलै २०१६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. सर्व्हेअर बॅच क्रमांक ७३ च्या एकूण ६६ विद्यार्थ्यांचा निकाल शून्य टक्के दाखविला जात आहे. नॅशनल काऊन्सिल आॅफ व्होकेशनल ट्रेनिंग यांच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सर्व्हेअर ट्रेड हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका ही दोन वर्षांच्या ट्रेडप्रमाणे तपासल्याचे स्पष्ट झाले आहे. योग्य न्याय मिळवून न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्राचार्यांना दिला आला. ट्रेड थेअरी आणि वर्कशॉप कॅलक्युलेशन अ‍ॅण्ड सायन्स, इम्प्लॉयबिलिटी स्कील या दोनही पेपरचा निकाल शून्य टक्के लागल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. प्राचार्यांकडे जाऊन याविषयी माहिती दिली असता याबाबतीत गांभीर्याने दखल न घेतल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. संस्थेच्या सर्व प्रशिक्षणार्थींनी त्यांच्या निकालाबाबत खात्री दर्शविली असून योग्य निकाल लवकरात लवकर हाती यावा याकरिता प्रयत्नशील आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक, राज्याचे पोलीस महासंचालकांना निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या ६६ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीची प्रतही ‘लोकमत’कडे दिली आहे. (प्रतिनिधी)