शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वादळी वाऱ्याने केली नवी मुंबईकरांची दैना, वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 09:01 IST

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी वादळी वातावरण निर्माण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सोमवारी सकाळपासून घामाच्या धारांनी नवी मुंबईकर चांगलेच हैराण झालेले असताना दुपारनंतर हवामान खात्याच्या  अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच दैना उडाली. या पावसासोबत धुळीचे वादळ आल्याने  संपूर्ण शहर धुळीने झाकोळले गेले हाेते. तर ३६ हून अधिक ठिकाणी वृक्ष कोलमडून पडल्याच्या वा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी बॅरिकेड्स उडून रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी चार वाजता  वादळी वातावरण निर्माण झाले. हे वादळी वारे पालघर, डहाणू येथून सुरू होऊन भिवंडी, कल्याण, बदलापूर मार्गे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येऊन धडकले. ताशी १०७ कि.मी. इतका वाऱ्याचा वेग होता. या वादळासोबत अवकाळी पाऊसदेखील सुरू झाला. शहरातील ठाणे-बेलापूर  रस्त्यासह सायन-पनवेल महामार्गावर रस्ते आणि पूल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स उडून रस्त्यावर आले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन ते हटविले. 

यादरम्यान  ऐरोली-मुलुंड मार्गावर महावितरणची उच्चदाब वीजवाहिनी खाली असल्याने मोठा अडथळा निर्माण होऊन मुंबईहून नवी मुंबईसह कल्याण-डोंबविली, पुणेकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. ही वीज वाहिनी पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.वाशी-कोपरखैरणे मार्गावर ठिकाणी रस्त्याचे काम महापालिकेकडून सुरू असून येथे लावलेले सूचना फलकही हवेच्या वेगामुळे कोसळले होते. 

पनवेल-उरण परिसरातही पावसाने जोरात हजेरी लावल्याने नवी मुंबईकरांप्रमाणे तेथील रहिवाशांची त्रेधातिपीट उडाली. विशेषत: मुंबई-गोवा मार्ग आणि जेएनपीएकडे जाणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला. त्यामुळे कोंडी निर्माण झाली होती. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस