शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:13 IST

सायन - पनवेल महामार्गावर वाशी गावाजवळील तीनही भुयारी मार्गाला लागून सर्व्हिस रोडचे बांधकाम करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको केला.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर वाशी गावाजवळील तीनही भुयारी मार्गाला लागून सर्व्हिस रोडचे बांधकाम करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको केला. पत्रव्यवहार करूनही प्रशासन दाद देत नसल्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तत्काळ कार्यवाही झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.महामार्गावर वाशी येथील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याठिकाणी वाशी गाव व सिडको नोडला जोडण्यासाठी तीन भुयारी मार्ग तयार केले आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करताना भुयारी मार्गांना जोडणारा सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून व स्थानिक नगरसेवकांनी यासाठी पाठपुरावा केला होता, परंतु प्रशासन दाद देत नसल्यामुळे सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास दहा मिनिटे ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.ग्रामस्थ आक्रमक झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मागण्यांची निवेदन स्वीकारले व सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्या अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. आश्वासनांची पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँगे्रसचे अध्यक्ष निशांत भगत, नगरसेविका वैजयंती भगत, रूपाली भगत, संजयराव यादव, रामेश्वर दयाल शर्मा, चंद्रकला नायडू, शैलेश घाग, सचिन शिंदे, विष्णू मेढकर, बंटी सिंग, सूरज देसाई व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.>आंदोलकांच्या प्रमुख मागण्याएनएमएसए येथून भुयारी मार्गाने महामार्गावर मुुंबईला जाणाºया दिशेने वेगवान वाहने जात असल्यामुळे अपघात होतात. यामुळे येथे सर्व्हिस रोड बनविण्यात यावा.नवी मुंबई स्पोर्ट क्लब येथील मुंबई व पुण्याकडे जाण्या - येण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करताना एमजीएम रुग्णालय, फोर्टीजकडे तत्काळ जाता यावे यासाठी सर्व्हिस रोड बनविण्यात यावा.वाशी गाव जुना बस स्टॅँडला जुन्या भुयारी मार्गाजवळ बनविलेल्या नवीन बस स्टॉप येथे स्थलांतर करावे. भुयारी मार्गाची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे.वाशी गावच्या जुन्या भुयारी मार्गात गळती सुरू असून पाणी साचत असते. येथे पाणी उपसण्यासाठी सक्षम पंप हाऊस बनविण्यात यावे.सतत होणारे अपघात थांबविण्यासाठी स्थानिक मच्छीमारांकरिताजुने खाडी पूल ते वाशीगाव असा पदपथ करण्यात यावा.खारघर टोल नाक्याप्रमाणे वाशी टोल नाक्याच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागी टोलनाका स्थलांतरितकरावा जेणेकरून वाशी गावात व महामार्गावर वाहतूककोंडी होणारनाही.>वाशी गावाजवळ सर्व्हिस रोड बनविण्यात यावा व इतर प्रश्न मार्गी लावण्यात यावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. काम सुरू केले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.-दशरथ भगत, माजी जिल्हा अध्यक्ष काँगे्रस