शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

उरणमध्ये राष्ट्रवादीच्या राज्य प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या गाडीवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 18:39 IST

गाडीचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मधुकर ठाकूरउरण : उरण शहरातून गणपतीचे दर्शन घेऊन खोपटा- द्रोणागिरी मार्गाने जात असताना काही अज्ञात समाजकंटकांनी राष्ट्रवादी राज्य प्रदेश महिला संघटनेच्या सरचिटणीस भावना घाणेकर यांच्यावर गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पाऊस व रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत ही दगडफेक करण्यात आली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी गाडीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 राष्ट्रवादी राज्य प्रदेश महिला संघटनेच्या सरचिटणीस भावना घाणेकर बुधवारी (१४ ) संध्याकाळच्या सुमारास उरण शहरातील सातरहाटी, कामठा येथील गणपतीचे दर्शन घेऊन इनोव्हा गाडीने वाशीकडे निघाल्या होत्या. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास खोपटा- द्रोणागिरी मार्गाने जात असताना कोसळणाऱ्या जोरदार पाऊस व अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटक, गुंडांनी गाडीच्या मागून दगड फेक केली. या दगडफेकीत काचा फुटून गाडीचे नुकसान झाले आहे. वाहन चालकानेही प्रसंगावधान राखून गाडी वेगाने पुढे नेली. यामुळे सुदैवाने कोणतीही शारीरिक इजा झाली नाही.

दरम्यान, या नरस्त्यावर रात्रीच्या वेळी फारशी रहदारी नसते. शिवाय दुतर्फा रस्त्यावरही अद्यापही लाईटची, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे या गंभीर घटनेचा तपास सध्या तरी पोलिसांसाठी एक प्रकारे आव्हान ठरले आहे. घटनास्थळी डीसीपी शिवराज पाटील, एसीपी धनाजी क्षीरसागर, उरण वपोनि सुनील पाटील आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र पोलिसांना तपास कामी मदत मिळेल दगडधोंड्यांशिवाय असा अद्यापही एकही धागा हाती लागलेला नाही. या गंभीर घटनेबाबत मात्र परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी भावना घाणेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी प्रकाश पवार अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :uran-acउरणNCPराष्ट्रवादी काँग्रेस