शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर ते एलिफंटा बोटसेवा सुरू

By admin | Updated: March 2, 2016 02:10 IST

शहरातील जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरी बोटसेवा सुुरू झाली आहे.

नवी मुंबई : शहरातील जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरी बोटसेवा सुुरू झाली आहे. नवी मुंबईच्या भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अरबी समुद्रात वसलेल्या एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. मात्र नवी मुंबईकरांना ही लेणी पाहायची असतील तर नवी मुंबईतून या ठिकाणी जाण्यासाठी काहीच साधन नव्हते. ही जलप्रवासाची सोय नवी मुंबई शहरवासीयांबरोबरच इतर सर्व पर्यटकांना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेने प्रवासी फेरी बोट सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध शासकीय खाती, संस्था तसेच महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. आता आवश्यक त्या सर्व परवानग्या संस्थेने प्राप्त केल्याची माहिती संस्थेचे सचिव हेमंत भोईर यांनी दिली. बेलापूर, रेतीबंदर सेक्टर १५ येथील तरंगत्या जेट्टीवरून बेलापूर ते एलिफं टा या मार्गावर दररोज दोन प्रवासी बोट फेऱ्या होणार आहेत. बेलापूरच्या जेट्टीची बांधणी आधुनिक पध्दतीने करण्यात आली असून, ती तरंगती असल्याने समुद्राच्या भरतीप्रमाणे ती खाली-वर होत असते. पावसाळा सुरू होईपर्यंत या वर्षी पर्यटकांना या प्रवासी बोट फेरीचा आनंद घेता येणार आहे. पावसाळ्यात ही सेवा बंद होणार असून, पावसाळा संपला की पुन्हा एकदा सुरू होणार आहे. प्रवासी सुरक्षेची पुरेपूर दक्षता घेतली जाणार असून, याकरिता लाइफ जॅकेट, पाण्याची खोली मोजणारी आधुनिक यंत्रणा, पाण्यावर तरंगणाऱ्या रिंग,जीपीएस प्रणाली अशा विविध सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. पूणे, ठाणे या शहरांप्रमाणेच नवी मुंबईलगत इतर शहरांमधील पर्यटकांनादेखील एलिफंटाला भेट देण्यासाठी ही प्रवासी फेरी पैशाची आणि वेळेची बचत करणारी सेवा ठरणार आहे. ४५ प्रवासी आसन क्षमता असलेल्या या बेलापूर ते एलिफंटा दुहेरी प्रवासाचे भाडे २८० रु पये आहे. बेलापूरमधून निघाल्यावर या बोटीतून २० मिनिटांत एलिफंटाला पोहोचतो. मंगळवार ते शुक्रवार सकाळी ९.३० वाजता पहिली प्रवासी फेरी बोट एलिफंटासाठी निघेल. ही बोट दुपारी १ वाजता पुन्हा बेलापूर जेट्टीत परतेल. शनिवार आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पहिली प्रवासी फेरी बोट एलिफंटासाठी निघेल आणि दुपारी १ वाजता परतेल, तर पुन्हा दुपारी २ वाजता निघेल आणि सायंकाळी ५.३० वाजता परतेल.