शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

क्रीडा संकुल बनले गर्दुल्ल्यांचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:23 IST

उद्घाटनानंतरही वापरात नसल्याने जुईनगर येथील क्रीडा संकुलाची इमारत समस्यांनी ग्रासली आहे.

नवी मुंबई : उद्घाटनानंतरही वापरात नसल्याने जुईनगर येथील क्रीडा संकुलाची इमारत समस्यांनी ग्रासली आहे. त्याठिकाणी रात्री अपरात्री गर्दुल्ल्यांच्या पार्ट्या रंगत असून, त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही वास्तू वापरासाठी खुली करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.नियोजनातील अभावामुळे पालिकेच्या वास्तू वापराविना पडून राहत असल्याचा प्रकार शहरात पाहावयास मिळत आहे. या प्रकारात संबंधित वास्तू उभारण्यावर खर्च केल्या जाणाऱ्या कोट्यवधीच्या निधीचा अपव्यय होत आहे. अशाच प्रकारे पालिकेच्या वतीने जुईनगर येथे उभारण्यात आलेले क्रीडा संकुल गेल्या दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. सेक्टर २५ येथील गणेश मैदानामध्ये हे आंतरक्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र त्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे मागील दोन वर्षांपासून दिसून येत आहे.क्रीडा संकुलाचे जुलै २०१७ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर आजतागायत ते सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे अडगळीची जागा बनलेल्या या वास्तूच्या आवाराचा वापर समाजकंटकांकडून होत असल्याचे तिथल्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून दारूच्या बाटल्यांचा खचही त्यात पहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी, टवाळखोरांच्या टोळ्या जमलेल्या असतात. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा संताप मनसे शाखा अध्यक्ष अक्षय भोसले यांनी व्यक्त केला आहे. वापराविना पडीक असलेल्या पालिकेच्या वास्तूच्या आवारात ठाण मांडून बसणाºया समाजकंटकांमुळे परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तर भविष्यात या समाजकंटकांकडून त्याठिकाणी एखादा गैरप्रकार केला जाण्याच्या शक्यतेचीही भीती भोसले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पंधरा दिवसात ही वास्तू वापरासाठी खुली करण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे. यासंदर्भातले पत्र त्यांनी पालिकेच्या मालमत्ता विभागाला दिले आहे, अन्यथा मनसेमार्फत ही वास्तू नागरिकांच्या वापरासाठी खुली करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.>समाजकंटकांकडूनवास्तूचा दुरुपयोगपालिकेने आंतरक्रीडा संकुलासाठी सदर वास्तू उभारण्यात आली. मात्र त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे खेळ सुरू होऊ न शकल्याने ही वास्तू वापराविना पडून होती. यानंतर ती एका संस्थेला वारकऱ्यांच्या वापरासाठी भाडेतत्त्वावर दिल्याचे समजते, परंतु सदर वास्तू प्रत्यक्षात वारकºयांऐवजी समाजकंटकांनाच उपयुक्त ठरत असल्याची टीका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.