नवी मुंबई- भरधाव कारने चारहून अधिक वाहनांना धडक दिल्याची घटना रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यात दोन दुचाकींचा समावेश आहे. ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली स्टेशन लगत हा अपघात घडला. यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
ठाणे बेलापूर मार्गावर भरधाव कारची अनेक वाहनांना धडक; तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 00:18 IST