शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

खारकोपर लोकलमुळे उलवेत विकासाला गती, रिअल इस्टेटला उठाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 04:49 IST

नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे.

नवी मुंबई - नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे. एकूणच नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे या क्षेत्राच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे.सिडकोने उलवे नोडची उभारणी केली. या नोडमध्ये अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रातील भूखंडांचे दर वाढले. उलवे नोडचा संभाव्य विकास लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली. साडेबारा टक्के योजनेअंतर्गतच्या भूखंडाचे ट्रेडिंग वाढले. त्यामुळे या भूखंडांनीही कोटीची उड्डाणे घेतली. विशेष म्हणजे मागील दहा वर्षांत या परिसरातील रियल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. खासगी विकासकांनी अनेक मोठमोठे प्रकल्प प्रस्तावित केले. काही ठिकाणी भूमिपूजनही झाले, तर काहींचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. मात्र पायाभूत सुविधांअभावी येथील मालमत्तांचे दर स्थिर राहिले. त्यामुळे बड्या विकासकांसह गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले. यातच सिडकोने या विभागात उन्नती हा गृहप्रकल्प साकारला. त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण होतील, असा आशावाद बांधकाम व्यावसायिकांत निर्माण झाला. परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रोसारख्या प्रकल्पांना झुकते माप देणाऱ्या सिडकोला या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा पुन्हा विसर पडला. त्यामुळे उन्नती प्रकल्पात राहावयास गेलेल्या चाकरमान्यांची कसरत सुरू झाली. नाले, गटारे, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, रस्ते तसेच वाहतुकीची साधने आदींचा अभाव असल्याने येथील रहिवाशांना कमालीची कसरत करावी लागली. विशेष म्हणजे या क्षेत्रात घरे व दुकाने खरेदी केलेल्यांची मोठी पंचाईत झाली. लोकवस्तीच नसल्याने या मालमत्ता पडून राहिल्या. एनएमएमटीने या भागात बसेसच्या काही फेºया सुरू केल्याने त्याचा काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यामुळे बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण लोकल सेवेची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर गेल्या महिन्यात या मार्गाच्या खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते खारकोपर आणि नेरूळ ते खारकोपर अशा सेवा सुरू झाल्याने या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा परिणाम म्हणून मागील महिनाभरात या परिसरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व भाडेकराराचे प्रमाणही वाढले आहे. इतकेच नव्हे, तर अनेक गृहसंकुलात कुलूप बंद असलेले वाणिज्यिक गाळ्यातून लहान-मोठे व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून आले आहे. स्थानक परिसरात फेरीवाले, हातगाडी व इतर लहान व्यावसायिकांची संख्या वाढू लागली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मागील दहा वर्षांपासून स्थिर राहिलेल्या येथील स्थावर मालमत्तेने आता उठाव घ्यायला सुरूवात केल्याने बांधकाम व्यावसायिक तसेच गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.पायाभूत सुविधांवर भरसिडकोने या क्षेत्रात पायभूत सेवा निर्माण करण्यावर भर दिला आहे. रस्ते, नाले, गटारे, दिवाबत्ती, सांडपाणी प्रक्रिया करणारे केंद्र, शाळा, उद्याने, खेळाची मैदाने, पेट्रोल पंप आदीबाबत कार्यवाही सुरू केली आहे.नागरी सुविधांची कोट्यवधींची कामे या विभागात सुरू आहेत. नेरूळ-उरण मार्गाचा दुसरा टप्पा पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्धार सिडको व मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे.तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुद्धा प्रगतिपथावर आहे. या पार्श्वभूमीवर उलवेसह नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या पुष्पकनगर नोडमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलNavi Mumbaiनवी मुंबई