शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या मुंबईच्या जागेवर आता विशेष प्रकल्प; राज्य सरकारच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 09:45 IST

लवकरच घोषणा होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांना दिलासा

ठळक मुद्देलवकरच घोषणा होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांना दिलासा

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील तिसरी मुंबई अर्थात महामुंबईचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या जागेवर विशेष प्रकल्प आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता नगरविकास विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या प्रस्तावित विशेष प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील विकासक आणि गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारने २०१८ मध्ये रायगड जिल्ह्यात तिसऱ्या मुंबईची  घोषणा केली होती. अलिबाग, रोहा, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी १९,१४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती. त्यानुसार सिडकोने कंबर कसली होती. 

भूसंपादनाच्या कामासाठी  अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. तसेच जमिनीच्या सर्वेसाठी मेट्रो सेंटरबरोबर करारही केला होता. त्याचे शुल्कसुद्धा मेट्रो सेंटरला अदा केले होते.  त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे सिडकोने योजिले होते.

परंतु त्याअगोदरच  हा  प्रकल्प रद्द करून भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश राज्य सरकारने सिडकोला दिले. त्यानुसार सिडकोने भूसंपादन प्रक्रिया थांबविली आहे. त्यामुळे  डी नोटीफाइड केलेल्या महामुंबईच्या १९,१४६ हेक्टर जागेवर आता विशेष प्रकल्प आणण्याचा निर्णय  राज्य सरकारने घेतला आहे.  याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

चार तालुक्यांतील जमिनीचे दर वधारलेनवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांची १८,८४२ हेक्टर जमीन संपादित केली आहे, तर महामुंबईचे क्षेत्र त्यापेक्षा जास्त आहे. विकासाच्या संधी लक्षात घेऊन विकासक आणि गुंतवणुकदारांनी प्रकल्पाची घोषणा होताच या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. त्यामुळे या चार तालुक्यांतील जमिनीचे दर वधारले.  जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहार तेजीत आले. अनेक गुंतवणूकदारांनी अव्वाच्यासव्वा दराने या परिसरात जमिनी खरेदी केल्या. मात्र हा प्रकल्पच रद्द झाल्याने स्थानिक भूधारकांसह विकासक आणि गुंतवणूकदार निराश झाले आहेत. 

सिडकोचा पन्नास कोटींचा खर्च पाण्यातमहामुंबई प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली होती. त्यासाठी सिडकोने   अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नेमणूक केली होती.  तसेच जमिनीच्या सर्वेसाठी मेट्रो सेंटरबरोबर करारही केला होता. त्याचे शुल्कसुद्धा मेट्रो सेंटरला सदा करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेवर सिडकोने ४० ते ५० कोटी रुपये खर्च केले होते. परंतु  प्रकल्पच गुंडाळला गेल्याने हा संपूर्ण खर्च पाण्यात गेला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडकोMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार