शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:23 IST

महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे

नामदेव मोरे ।नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात गतवर्षीपेक्षाही ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल एवढा निकष असताना ऐरोली व घणसोलीमध्ये ते ७३ डेसिबलपर्यंत गेले आहे. शांतता क्षेत्रामध्येही दिवस-रात्र गोंगाटाची स्थिती असल्याचे यावर्षीच्या पर्यावरण स्थिती अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले असून शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची स्थिती व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१६-१७ वर्षाचा वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल १८ आॅगस्टला होणाºया सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या वास्तवाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवासी, औद्योगिक रहदारी व शांतता क्षेत्रामध्येही ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबल हा निकष निश्चित करण्यात आला आहे. परंतु एकाही विभागामध्ये या मर्यादेचे पालन होत नाही. घणसोली विभाग कार्यालय व ऐरोली से. १८ व १९ या जलकुंभ येथे सरासरी ७३ डेसिबलची नोंद झाली आहे. त्यानंतर वाशी हॉस्पिटल से. १० जवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.वाशी हॉस्पिटलजवळ २०१५-१६ वर्षामध्ये ५८ डेसिबलची नोंद झाली होती. २०१६-१७ या वर्षामध्ये ६ टक्केने वाढ होवून ते प्रमाण ६९ डेसिबल झाले आहे. रहदारी असणाºया क्षेत्रामध्ये आवाजाची पातळी वाढली आहे. दिघा विभाग कार्यालय परिसरामध्ये ७० डेसिबल, रबाळे पंप हाऊस व बेलापूर अग्निशमन केंद्राजवळ ६९ डेसिबलची नोंद झाली आहे.महानगरपालिका व वाहतूक विभागाने शहरातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, धार्मिक स्थळे, वृद्धाश्रम असणारी ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. परंतु प्रत्यक्षात एकाही ठिकाणी शांतता दिसत नाही. प्रचंड गोंगाटामुळे विद्यार्थी, रुग्ण व इतर घटकांना त्रास होवू लागला आहे. शांतता क्षेत्रामध्ये ५० डेसिबलचा निकष आहे. पण प्रत्यक्षात कोपरखैरणे रा. फ. नाईक परिसरामध्ये ६५ डेसिबल, माथाडी हॉस्पिटल से. ५ परिसरामध्ये ६४ डेसिबलची नोंद झाली आहे. सीबीडी से. ४ मधील ज्ञानपुष्प विद्यामंदिर येथे सर्वात कमी ५५ डेसिबलची नोंद झाली असली तरी मूळ निकषांपेक्षा जास्त आहे.ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे आव्हान पालिका व वाहतूक विभागासमोर उभे राहिले आहे. आवाजाची पातळी अशीच राहिली तर भविष्यात रक्तदाब, बहिरेपणा, चिडचिड होणे व इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण यांच्या त्रासामध्येही भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.>वाहनांमुळे वाढले प्रदूषणशहरामधील वाहनांची वाढती संख्याही ध्वनिप्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. २००९-१० या वर्षामध्ये २ लाख ३ हजार वाहने होती. २०१६-१७ मध्ये ही संख्या ४ लाख २५ हजार एवढी झाली आहे. एपीएमसी, एमआयडीसी, सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर रोड परिसरात २४ तास हजारो वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या आवाजामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.नो हॉर्न मोहीमध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शहरामध्ये नो हॉर्न मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज आहे. निवासी क्षेत्रातही विनाकारण वाहनधारक विशेषत: मोटारसायकल चालविणारे तरुण हॉर्न वाजवत असतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. शहरवासीयांच्या आरोग्य रक्षणासाठी नो हॉर्न मोहीम राबविण्यासाठी वाहतूक पोलीस, महानगरपालिका व सामाजिक संघटनांनी राबविण्याची गरज आहे.आरोग्यावर परिणामध्वनिप्रदूषणाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होवू लागला आहे. नागरिकांना रक्तदाब, चिडचिडेपणा, मानसिक संतुलन ढासळणे व बहिरेपणा येण्याची भीती व्यक्त केली जात असून याविषयी गांभीर्याने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.शहरातील ध्वनिप्रदूषणाचे वास्तवऐरोली व घणसोली निवासी क्षेत्रामध्ये ७३ डेसिबलची नोंदवाशी हॉस्पिटलजवळ ६९ डेसिबलची नोंदरहदारी क्षेत्रामध्ये दिघामध्ये ७० डेसिबलची नोंदरबाळे व बेलापूरमध्ये ६९ डेसिबलची नोंदशांतता क्षेत्रामध्ये रा. फ. नाईक विद्यालयजवळ ६५ डेसिबलची नोंद>ध्वनी पातळीचे निकष पुढीलप्रमाणेक्षेत्र डेसिबलनिवासी ५५रहदारी ६५शांतता ५०