शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

तळोजा मध्यवर्ती कारागृहात सौरऊर्जा प्रकल्प

By admin | Updated: May 30, 2016 02:15 IST

वीजबचतीसाठी जगभरात विविध कार्यक्रम राबवून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे.

वैभव गायकर,

पनवेल- वीजबचतीसाठी जगभरात विविध कार्यक्रम राबवून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने देखील याकरिता मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले जातात. सोलार सिस्टीमचा वापर करून जास्तीत जास्त वीजबचतीचा प्रयत्न सध्या सगळीकडे पहावयास मिळत आहे. या अंतर्गत सौरऊर्जा हा प्रकल्प राबवून तळोजा मध्यवर्ती कारागृह परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार आहे. रायगड जिल्हाधिकारी व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याकरिता आर्थिक सहाय्य केले आहे.तळोजा मध्यवर्ती कारागृहात अबू सालेमसह अनेक कुविख्यात कैदी आहेत. या कारागृहातील कैद्यांची संख्या १७०० च्या आसपास आहे. तळोजा कारागृह परिसरात सौरऊर्जा प्रकल्पाअंतर्गत एकूण २८० पोल उभारले जाणार आहेत. त्यापैकी ११५ पोल हे कारागृहाच्या आतील भागात लावले जाणार आहेत, तर उर्वरित १६५ पोल कारागृहाबाहेरील परिसरात लावले जाणार आहेत. याकरिता एकूण ४० लाख रु पये खर्च होणार असून त्यापैकी ३० लाख रु पयांचा निधी रायगड जिल्हाधिकारी उपलब्ध करणार असून उर्वरित १० लाख रु पये मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे सौरदिवे उभारणीचे काम इंफ्रोंन्स या खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे जेल परिसरात विजेचा ताण कमी पडणार असून सुमारे एक लाखाची वीजबचत होणार आहे. सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे महिन्याचे वीजबिल तीन लाखांच्या आसपास येते. या प्रकल्पामुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणात कपात होणार असल्याची प्रतिक्रि या कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांनी दिली. कारागृहाचे मुख्य अधीक्षक सदानंद गायकवाड, अशोक कारकर, सुवर्णा चोरगे आदींच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. >महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन (मेढा) प्रकल्पाअंतर्गत विद्युतीकरण कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. याकरिता राज्य शासन २५ लाख रु पये निधी उपलब्ध करून देणार आहे. दिवस-रात्र या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. दोन्ही वेळेला या प्रकल्पांतर्गत दिवे स्वयंप्रकाशित होणार आहेत.