शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीला हवे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:55 IST

फसवणुकीच्या तक्रारींत चिंताजनक वाढ

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : मागील तीन वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सायबर गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. २०२०मध्ये सायबर गुन्ह्याशी संबंधित ५००हून अधिक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या असून, त्यात २७८ गुन्हे दाखल आहेत. मात्र गुन्हे उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने आयुक्तालयासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची आवश्यकता भासत आहे.

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात सायबर गुन्हे हे नागरिकांसह पोलिसांना आव्हान देणारे ठरत आहेत. मागील तीन वर्षात नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. २०१८मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्याशी संबंधित १२० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तर २०१९मध्ये त्यात वाढ होऊन ४१७ तक्रारी नोंद झाल्या होत्या. मात्र २०२० मध्ये सायबर सेलकडे ५००हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २७८ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आयटीशी संबंधित २३२ गुन्हे असून, केवळ २१ गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली आहे. भविष्यात सायबर गुन्हे अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाची स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची नितांत गरज भासत आहे. ते झाल्यास स्थानिक पोलीस ठाण्याऐवजी थेट सायबर पोलीस ठाण्यातच गुन्हा होऊन तपासाला गती मिळू शकते. राज्याच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये असे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहेत. परंतु स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या बाबतीतच होत असलेल्या उदासीनतेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्पn पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी गुन्हे शाखेअंतर्गत एकमेव सायबर सेल कार्यरत आहे. त्यामध्ये एक वरिष्ठ निरीक्षक, चार अधिकारी व नऊ कर्मचारी यांचा समावेश आहे. n घडलेल्या या गुन्ह्याची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद केली जाते. त्यानंतर सायबर सेलकडून गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक तांत्रिक माहिती पुरवली जाते. n ही प्रक्रिया वेळखाऊ व सदोष असल्याने तसेच सायबर सेलचे अपुरे मनुष्यबळ, यामुळे बहुतांश गुन्ह्यांचा तपास मुळाशी पोहोचत नाही. परिणामी सायब गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

२०२० मधील गुन्हेऑनलाइन    १०९फेसबुकद्वारे    ०४कार्ड क्लोनिंग    १५ओटीपी मिळवून    ५५ओएलएक्स    ३२एकूण    २७८

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई