नवी मुंबई/पनवेल : पनवेल, उरण, नवी मुंबईमध्येदिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक पद्धतीने चोपडीपूजन करण्यात आले. शहरवासीयांनी सफाई कामगार, आदिवासींसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले.दिवाळीनिमित्त नवी मुंबईसह, पनवेल परिसर दिव्यांनी उजळला आहे. संपूर्ण शहरात रोषणाई करण्यात आली आहे. पामबीच रोडवरील महापालिका मुख्यालयाला केलेली रोषणाई पाहण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी केली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लक्ष्मीपूजनादिवशी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. भाजी व फळ मार्केटमध्ये ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये ऋणानुबंध निर्माण झालेले असतात. यामधून अनेकांना उदारीवर मालाची विक्री केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वर्षभरातील उदारी जमा केली जाते. यामुळे खºया अर्थाने मार्केटमध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते. वर्षभर व्यापाºयांच्या कुटुंबीयांचा मार्केटशी संबंध येत नाही; परंतु दिवाळीच्या दिवशी व्यापारी सहकुटुंब मार्केटमध्ये येत असतात. मार्केटला कुटुंब मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाजी मार्केटमध्ये पारंपरिक पद्धतीने सामूहिक चोपडीपूजन करण्यात आले. दिवाळीमध्ये यात्रा असते. एक दिवसअगोदर समुद्रामधून भैरीनाथाची मूर्ती शोधून गावामध्ये आणली जाते. गावामधून देवाची पालखी काढली जाते. या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहतात.नवी मुंबईसह पनवेलकरांनी दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडविले. वाशी, सानपाडा येथे लोकप्रतिनिधींनी सफाई कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सफाई कामगार वर्षभर मेहनत घेत असल्यामुळे शहर स्वच्छ राहते. स्वच्छतेमध्ये देशात नवी मुंबईचा नावलौकिक झाला असून, त्यामध्ये सफाई कामगारांचाही मोठा वाटा असतो. यामुळे कामगारांना शुभेच्छा देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.सानपाडामध्ये नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी कामगारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. सामाजिक संस्थांनी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिवाळी साजरी केली. अनाथालय व वृद्धाश्रमामधील नागरिकांना फराळाचे वाटपही करण्यात आले.बेलापूर किल्ल्यावर दीपोत्सव साजरादिवाळी निमित्ताने राजमुद्रा प्रतिष्ठान जुईनगर, जाणता राजा प्रतिष्ठान नेरु ळ आणि दुर्ग मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील किल्ल्याच्या बुरु जात दीपोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या सहा वर्षापासून राबविल्या जाणाºया या उपक्र मात बेलापूर केल्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा लावण्यात आला आणि रांगोळी काढून किल्ल्यावर सुमारे १५० ते २०० दिवे लावण्यात आले, तसेच शिवरायांच्या चरणी आरती आणि शिवसाधना करून फराळवाटप आदी कार्यक्र म राबविण्यात आले. या कार्यक्र माला अभिजित भोसले, स्वप्निल घोलप, धनाजी शेवाळे, रवींद्र कोळेकर आदी उपस्थित होते.खरेदीला प्राधान्य : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शहरवासीयांनी खरेदी केलेली वाहने घरी आणून त्यांची पूजा केली. अनेकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दागिने खरेदीलाही प्राधान्य दिले होते. सुट्टी असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.फटाक्यांचा वापर कमी झाला : उच्च न्यायालयाने फटाके कधी वाजवावे, याविषयी दिलेला आदेश व नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी निर्माण झालेली जागरूकता यामुळे या वर्षी फटाक्यांचा वापर कमी झाल्याचे निदर्शनास आले. यंदा फटाके खरेदी घटल्याची माहिती काही विक्रेत्यांनी दिली.शहरात कडक बंदोबस्त : लक्ष्मीपूजनानिमित्ताने एपीएमसी मार्केट, ज्वेलर्समध्ये, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साध्या वेशातील पोलीसही तैनात होेते.
स्मार्ट सिटींमध्ये दिवाळी उत्साहात, शहरवासीयांनी घडविले सामाजिक बांधिलकीचेही दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:50 AM