शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

नवी मुंबईसह तळोजा एमआयडीसीत कोरोनामुळे मंदावले उद्योगांचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:50 IST

मनुष्यबळाची कमतरता; कच्चा माल मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम

नामदेव माेरे -

नवी मुंबई : शासनाने एमआयडीसीमधील सर्व उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता व कच्चा माल मिळत नसल्याॐए उत्पादनक्षमता ५० टक्क्यांवर आहे. उद्योग टिकविताना तारेवरची कसरत होत आहे. राज्यातील सर्वात प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे- बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास ५ हजार छोटे-मोठे व तळोजामध्ये जवळपास १६२२ कारखाने आहेत. तीन लाखपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला आहे. दुसरी लाट सुरू झाल्यानंतरही शासनाने उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु इतर समस्यांमुळे उद्योगांचे चाक गाळातच रुतत चालले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने इंजिनिअरिंग उद्योग जवळपास ठप्प झाला आहे. कोरोनाच्या भीतीने कामगार गावाकडे गेल्यामुळे पुरेसे मनुष्यबळ नाही. कच्चा माल मिळत नाही. उद्योगांना माल पोहोचविणारे व्यवसाय बंद आहेत. या सर्वांचा परिणाम उद्योगांवर होत आहे. लहान उद्योजकांचे कंबरडे मोडत असून, आर्थिक स्थिती खालावत आहे. पूर्णक्षमतेने व्यवसाय सुरू झाले, तरच उद्योग टिकविणे शक्य होणार आहे.

ऑक्सिजनचा परिणामकारखान्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा जवळपास बंद आहे. ऑक्सिजनच मिळत नसल्यामुळे फॅब्रिकेशन व इतर इंजिनिअरिंगची कामे बंद आहेत. जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होणार नाही, तोपर्यंत कारखानेही सुरू होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वाहतुकीचा प्रश्नऔद्योगिक वसाहतीमध्ये मुुंबई, ठाणे व इतर परिसरातून अनेक कामगार येतात. या कामगारांना रेल्वे व बसने प्रवास करता येत नाही. यामुळे कामगारांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्याचा परिणामही उद्योगांवर होत आहे.

ठाणे- बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने सुरू आहेत. परंतु कच्चा माल मिळत नाही. मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.- एम. एम. ब्रम्हे    सचिव, टीबीआयए

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजन गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. उद्योग सुरू आहेत. परंतु गॅस, मनुष्यबळ व इतर साहित्याचा पुरवठा होत नसल्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही.- के. आर. गोपी    अध्यक्ष - टीएमआयए

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील व्यवसाय सुरू आहेत. परंतु उद्योगांना कच्चा माल व इतर साहित्य पुरविणारे व्यवसाय बंद असल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. वाहतूक, गॅसपुरवठा व इतर अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे.- सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन

कच्चा माल कोठून आणायचा?एमआयडीसीमधील कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु कारखान्यांना कच्चा माल पुरविणारे व्यवसाय बंद ठेवले आहेत. यामुळे कच्चा माल आणायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांसाठी लागणारे हार्डवेअर व इतर साहित्यही मिळत नाही. यामुळे उत्पादनक्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे. 

टॅग्स :businessव्यवसायNavi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस