शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांतील पॉक्सोच्या गुन्ह्यांचा पुन्हा तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 05:08 IST

पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांत अटक केलेल्या रेहान कुरेशी याने लग्न होत नसल्याने अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्या प्रवृत्तीला सुरुवातीच्या काळातच लगाम बसला असता; परंतु पोलिसांच्या आरोपीच्या वयाविषयी चुकीच्या नोंदीमुळे त्याची अटक टळली होती.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांत अटक केलेल्या रेहान कुरेशी याने लग्न होत नसल्याने अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्या प्रवृत्तीला सुरुवातीच्या काळातच लगाम बसला असता; परंतु पोलिसांच्या आरोपीच्या वयाविषयी चुकीच्या नोंदीमुळे त्याची अटक टळली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनीच आरोपीला अटक केली असून पोलिसांनी आता पाच ते सहा वर्षांतील पॉक्सोच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे.मागील दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रेहान अब्दुल राशिद कुरेशी (३४) याला गुन्हे शाखा पोलिसांनी मीरा रोड येथून बुधवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करूनही त्याचे लग्न होत नव्हते. मोठ्या भावाने रेहान व भाजून जखमी झाल्याने घरीच असलेल्या एका भावाचे एकत्र लग्न लावून देण्याचाही प्रयत्न केलेला; परंतु अनेक कारणांनी रेहानचे लग्न जुळत नसल्याने दोघेही अविवाहित आहेत. यामुळेच वासनेतून लहान मुलींना लक्ष्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, जे गुन्हे नोंदीवर आहेत, त्याचीच पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली आहे. परंतु बदनामीच्या भीतीमुळे काही पालकांनी रेहानने केलेल्या अत्याचाराविरोधात तक्रार करण्याचे टाळणारेही काही पालक पोलिसांसमोर आले आहेत. यामुळे रेहानच्या गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी मागील पाच ते सहा वर्षांत उघड न झालेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यांचा नव्याने तपास होणार आहे.दरम्यान, रेहान हा यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागला असता. परंतु तळोजा पोलिसांच्या जुन्या नोंदीवरील चुकीचे वय व पूर्वकल्पना देऊनही पालघर पोलिसांचा झालेला गाफीलपणा यामुळे त्याला पुढील गुन्ह्याची संधी मिळत गेली. २३ जानेवारी २०१५ मध्ये रेहानवर तळोजा पोलीसठाण्यात आठ वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा पहिला गुन्हा दाखल असून त्यात अटक देखील झालेली. परंतु गुन्हा नोंदवताना तत्कालीन अधिकाºयांच्या दुर्लक्षाने कागदोपत्री त्याचे वय चुकीने ३० ऐवजी ३४ लागले. यामुळे पॉक्सोच्या गुन्ह्यांची मालिका सुरू असताना, सीसीटीव्हीतील संशयिताला पकडण्यासाठी नेमका तोच गुन्हा सोडून पोलिसांनी २५ ते ३० वयोगटातील पॉक्सोच्या इतर सर्व आरोपींची माहिती तपासली, अन्यथा वर्षभरापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले असते.तर १३ सप्टेंबरला तुळींज पोलीसठाण्यात घडलेल्या गुन्ह्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना घटनेचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर पुन्हा २० तारखेला श्रीरामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने दुसरा गुन्हा केला. पालघर पोलिसांना गुन्ह्याचे गांभीर्य नसल्याने २१ तारखेला त्याच परिसरात त्याने तिसरा गुन्हा केला.दहा दिवसांची कोठडीरेहानला अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला ६ आॅक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान चौकशीत त्याच्याकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहेरेहान कुरेशी याने पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली असली, तरीही त्याने इतरही अनेक गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे अद्याप लग्न झालेले नसून शारीरिक भूक भागवण्यासाठी त्याने अल्पवयीन मुलींना लक्ष्य केल्याचेही कबूल केले आहे. त्याने केलेल्या इतरही गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी उघड न झालेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यांचा पुन्हा तपास केला जाणार आहे.- तुषार दोशी,गुन्हे शाखा उपआयुक्त आॅपरेशन मन‘मोहन’ यशस्वीसीसीटीव्हीत दिसणाºया चालीवरून गुन्हे शाखा पोलिसांनी या मिशनला आॅपरेशन मन‘मोहन’ नाव दिले होते. त्यामध्ये १०० हून अधिक पोलिसांना तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. शिवाय दोन पथकांवर मीरा रोडची जबाबदारी सोपवण्यात आलेली. त्यामध्ये गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे, सहायक निरीक्षक उल्हास कदम व राहुल राख, तर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार, उपनिरीक्षक योगेश वाघमारे, विजय चव्हाण यांचा समावेश होता. त्यानुसार झोपेत सुद्धा रेहानची चाल ओळखतील एवढा त्याच्याविषयी अभ्यास केल्याने उपनिरीक्षक वाघमारे यांनी मीरा रोड स्थानकालगतच्या गर्दीतून अवघ्या चालीवरून त्याला शोधून काढले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी