शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सहा समित्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे, दोन प्रभागात शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 2:07 AM

महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली.

नवी मुंबई : महापालिकेच्या आठ प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या वेळी एच प्रभागच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून अध्यक्षाची निवड करण्यात आली. कोकण विभागाचे अप्पर आयुक्त राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली.सीबीडी येथील महापालिका मुख्यालयात प्रभाग समितींच्या अध्यक्षांची निवडणूक झाली. त्यास कोकण विभागाचे अप्पर आयुक्त राजेंद्र क्षीरसागर हे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. या वेळी झालेल्या निवडणुकीत ‘अ’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी स्वप्ना गावडे, ‘ब’ प्रभाग समितीवर श्रद्धा गवस, ‘क’ प्रभाग समितीवर अंजली वाळुंज, ‘ड’ प्रभाग समितीवर उषा भोईर, ‘ई’ प्रभाग समितीवर लीलाधर नाईक, ‘फ’ प्रभाग समितीवर रंजना सोनवणे तर ‘जी’ प्रभाग समितीवर आकाश मढवी यांची बिनविरोध निवड झाली. या दरम्यान ‘एच’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी दीपा गवते व जगदीश गवते यांनी अर्ज भरले होते. त्यांना प्रत्येकी तीन मते मिळाल्याने दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यामधून एक चिठ्ठी विद्यार्थ्याद्वारे उचलण्यात आली. त्यामध्ये जगदीश गवते यांची ‘एच’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवड जाहीर करण्यात आली, त्यानुसार सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचे पीठासन अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnmmcनवी मुंबई महापालिका