शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:20 IST

महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

नवी मुंबई : महावितरणने लादलेले लोडशेडिंग व कळवा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे नवी मुंबईत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या समस्येमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.नवी मुंबईमधील तापमान ३६ अंशावर गेले आहे. तीव्र उकाड्यामुळे शहरवासी त्रस्त झाले असताना दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गुरुवारी ३१ मे रोजी घणसोली परिसरात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन करून माहिती घेण्यास सुरवात केली होती, परंतु व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. शहरातील इतरही काहीपरिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला होता.बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कळवा येथील उपकेंद्रामध्ये अचानक स्फोट झाल्याने विजेच्या लपंडावामध्ये भर पडली आहे. या परिसरातील वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा महावितरणकडून प्रयत्न सुरू असून शहरात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू केले आहे. महापारेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास अजून एक दिवस विलंब लागणार आहे. यामुळे विजेचा लपंडाव सुरू राहणार असल्याचे महावितरणच्यावतीने स्पष्ट केले आहे.घणसोली परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणच्यावतीने नागरिकांना वेळेवर माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे अशीच स्थिती राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. वाशी, नेरूळ, सीवूड व सीबीडी बेलापूर परिसरामध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईकरांवर भारनियमन लादले जावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शुक्रवारी ऐरोली ते सीबीडीपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे अनेक नागरिकांनी शहरातील मॉल्सचा आश्रय घेतल्याचे चित्र पहावयास मिळत होते. विद्युतपुरवठा कधी सुरू होणार याची विचारणा करण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात शेकडो नागरिक फोन करुन विचारणा करत होते.एमआयडीसीच्या कामावर परिणामवीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. शुक्रवारमुळे कारखाने बंद झाले असले तरी आयटी पार्क व इतर उद्योगांवर परिणाम झाला होता. शनिवारी वेळेत वीजपुरवठा सुरू झाला नाही तर अनेक कारखाने बंद ठेवावे लागणार असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.गरमीमुळे नागरिकांचे हालऐरोली ते सीबीडीपर्यंत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे घरात व कार्यालयांमध्ये थांबणेही अशक्य झाले होते. वीजपुरवठा लवकर पूर्ववत व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.