शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पंधराशे कोटी खर्चूनही सायन-पनवेल महामार्ग धोकादायक; देखभालीकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 00:06 IST

भुयारी मार्गात पाच फूट पाणी

वैभव गायकरपनवेल: सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शासनाने पंधराशे कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण केले आहे, परंतु चुकीची रचना व निकृष्ट कामांमुळे भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाच फूट पाणी साचले असल्यामुळे त्यांचा वापर होत नसून, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

वाहनांची सर्वाधिक वर्दळ असणाºया राज्यातील महत्त्वाच्या महामार्गामध्ये सायन-पनवेलचा समावेश आहे. महामार्गावर वारंवार वाहतूककोंडी होत असल्यामुळे शासनाने या महामार्गाचे रुंदीकरण केले. या कामासाठी जवळपास १,५०० कोटी खर्च करण्यात आले. वाशी, सानपाडा, जुईनगर, उरण फाटा, तळोजा लिंक रोड, कामोठे येथे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत, तर खारघर, कामोठे, तळोजा लिंक रोड, उरणफाटा, नेरुळ या ठिकाणी भुयारी मार्ग तयार केले आहेत, परंतु भुयारी मार्गांची रचना चुकली असून, ते खूपच अरुंद झाले आहेत. बांधकाम निकृष्ट झाले असून, सर्व भुयारी मार्गांत पाणीगळती सुरू आहे. खारघरमधील मार्गात पाच फूट पाणी साचले आहे. इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. भुयारी मार्गाचे दरवाजेही सडले आहेत.

ठेकेदाराकडून भुयारी मार्गाची देखभाल केली जात नाही. पाच वर्षांत एकदाही दुरुस्तीची कामे केली नाहीत. वास्तविक, शासनाने ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक आहे, परंतु कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. भुयारी मार्ग बंद असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने रस्ता ओलांडावा लागत आहे.पालिकेचा खर्चही व्यर्थमहामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती ठेकेदार करत नसल्याने, नवी मुंबई महानगरपालिकेने नेरुळमधील भुयारी मार्गांची दुरुस्ती केली होती, परंतु तेथील मार्गांचीही दुरवस्था झाली असून, महानगरपालिकेचा खर्चही व्यर्थ गेला आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग