शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

महापे औद्योगिक नगरीत रस्त्यांची चाळण; मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 00:25 IST

अनेक ठिकाणी विविध कामांसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे आजही परिस्थिती जैसे थे आहे.

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी म्हणून ठाणे-बेलापूर टीटीसी एमआयडीसी या नावाने नवी मुंबई शहराची ओळख आहे. येथे रस्ते, गटारे, डेब्रिज, मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे वाढते अतिक्रमण, ड्रेनेजच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे महापे टीटीसी, एमआयडीसी परिसरातील कारखान्यांचे उद्योजक तसेच हजारो कामगारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

महापे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी लाखो रुपयांची निविदा मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही रस्ते बनवले नाहीत. अशी येथील चाकरमान्यांची तक्रार आहे. येथील एनएमएमटी बस डेपोला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने अनेक लहानमोठी वाहने चिखलात अडकून पडली आहेत.  अनेक ठिकाणी कारखान्यांच्या मलनिस्सारण वाहिन्या आणि पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या फुटल्यामुळे हेच पाणी खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचत आहे. अनेक ठिकाणी विविध कामांसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे आजही परिस्थिती जैसे थे आहे.

मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांचे वास्तव्यआनंदनगर सोसायटीच्या मोकळ्या भूखंडांवर २०० ते २५० अनधिकृत झोपड्यांची संख्या असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत असून या झोपडपट्टी वासियांकडून होणारी अस्वच्छता व त्यामुळे होणारा डासांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या बनली आहे. झोपड्यांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे लोक वास्तव्यास असल्यामुळे चोऱ्या आणि मारामारीचे प्रकार नेहमीच घडत असल्याचे सांगण्यात येते. या दैनंदिन प्रकारामुळे येथील उद्योजक तसेच नोकरी व्यवसायानिमित्त येथून येणारे-जाणारे चाकरमानी बेजार झाले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा