शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी दुरुस्तीचा शटडाउन ७२ तासांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:08 IST

हेटवणे धरणातील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सिडकोच्या वतीने २२ जानेवारी रोजी २४ तासांचा शटडाउन घेतला होता.

पनवेल : हेटवणे धरणातील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सिडकोच्या वतीने २२ जानेवारी रोजी २४ तासांचा शटडाउन घेतला होता. मात्र, हा शटडाउन सुमारे ७२ तासांवर गेल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. उलवे नोडसह खारघर शहरात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.खारघर शहरात शटडाउनचा सर्वात जास्त फटका बसला. तीन लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. अनेकांना विकत पाणी घ्यावे लागले. विशेष म्हणजे सिडकोच्या शून्य नियोजनाची प्रचिती नागरिकांना आली. खारघर शहरासह कोपरा, मुर्बी, बेलपाडा गावातही शटडाउनचा परिणाम झाला. खारघर शहरातील सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी निखिल यादव यांना विचारणा केली असता, सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत ते कोणतीही माहिती देऊ शकले नाही.हमरापूर ते जीते येथे दरम्यान जलवाहिनी जोडताना स्थानिक पातळीवर समस्या उदभवली होती. त्यामुळेच 24 तासांचा शटडाऊन उशिरापर्यंत गेला. गुरु वारी उशिरापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सिडकोमार्फत सांगण्यात आले. खारघर, द्रोणागिरी, तसेच उलवे नोडसह हेवटणे धरणापासून सुरु झालेल्या जलवाहिनीवर अवलंबून सुमारे १०० गावांना अपुरा पाणी पुरवठ्याचा फटका बसल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.>खारघरमध्ये दूषित पाणीपुरवठाखारघर सेक्टर १२ मधील धनलक्ष्मी सोसायटीत बुधवारी सायंकाळी अचानक दूषित पाणीपुरवठा झाला. एकीकडे पिण्यासाठी पाणी नसताना दूषित पाणीपुरवठा सुरू झाल्याने रहिवाशांनी सिडकोविरोधात नाराजी व्यक्त केली. या सोसायटीत अनेक रहिवासी दूषित पाणी पिल्याने आजारी देखील पडले आहे. जीर्ण झालेल्या जलवाहिनीत गटारातील पाणी मिसळल्याने हा दूषित पाणीपुरवठा झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Waterपाणी