शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस, विभागीय बोर्डाकडून अतिरिक्त शुल्क आकारणाºयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 07:04 IST

- प्राची सोनवणेनवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी, नवी मुंबईतील महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत, अशाप्रकारे विद्यार्थी तसेच पालकांची लूट करणाºया महाविद्यालयांवर कठोर कारवाई करणार ...

- प्राची सोनवणेनवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी, नवी मुंबईतील महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत, अशाप्रकारे विद्यार्थी तसेच पालकांची लूट करणाºया महाविद्यालयांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा बोर्डाने दिला. अतिरिक्त शुल्क आकारणी प्रकरणी महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस देत, अशा महाविद्यालयांवर ठोस कारवाईचे संकेत बोर्डाच्या वतीने देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे आॅनलाइन पद्धतीने मंडळास प्राप्त झालेली असून, आवेदनपत्रातील दुरुस्तीकरिता प्री लिस्ट उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या दुरुस्त्या मंडळाकडून विनाशुल्क करण्यात आल्याचेही बोरसे यांनी स्पष्ट केले. प्रवेशपत्र मिळाल्यानंतरच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता, कनिष्ठ महाविद्यालयाने मंडळाकडे शुल्क जमा करणे आवश्यक आहे. अवास्तव शुल्क आकारणी करणाºया महाविद्यालयांना मात्र बोर्डाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविली जात असून, प्रशासकीय कारवाईचे संकेत या वेळी देण्यात आले आहेत. कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या महाविद्यालयाला संबंधितविषयी दोन दिवसांत खुलासा सादर करणे सक्तीचे आहे.अशाप्रकारे अतिरिक्त शुल्क आकारणी करणाºया महाविद्यालयांविषयी बोर्डाकडे तक्रार केल्यास त्वरित कारवाई करणार असल्याची माहिती विभागीय बोर्डाने दिली असून, विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.विद्यार्थ्यांचावेळ वायाहॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, शनिवारपासून तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होणार असूनही अभ्यासाला वेळ देता येत नाही. ऐनवेळी हॉल तिकिटातच त्रुटी आढळल्याने गोंधळ उडाला असून, महाविद्यालयाकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. सलग तीन दिवस महाविद्यालयाला फेºया घालूनही विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.अभ्यास कधी करायचा?च्ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासाऐवजी हॉल तिकीट दुरुस्तीच्याच कामात जात असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयसीएल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना तीव्र संताप व्यक्त करत, सलग तीन दिवस फेºया मारूनही काम झाले नसून, २०० ते ३०० रुपये शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याची माहिती दिली.च्महाविद्यालयात या प्रकरणी विचारणा केली असता, अरेरावीपणाची उत्तरे दिली जात असून, ‘तुमचे काम आहे, तुम्हाला रोज यावे लागेल’ अशी उत्तरे मिळत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आधी पैसे भरा, मगच दुरुस्ती केली जाईल, असा नियम केला असून विद्यार्थ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या