शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आधी ठाणे आता नवी मुंबई; ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार?; ठाकरेंच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 16:24 IST

ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाला आणखी एक मोठा झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. गुरूवारी या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. 

ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर शिवसेनेचे ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिवसेनेसाठी हा आणखी मोठा धक्का आहे. 

ठाण्यातील नगरसेवकांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. कारण मागील २५ वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, ठाण्यातील एक दिग्गज नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या या खेळीमुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेची वाटचाल अतिशय खडतर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या ६६ नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर अद्याप शिवसेनेकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही. 

शिवसेनेच्या अडचणीत वाढ 

मोठ्या कालावधीपासून ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचे एकतर्फी वर्चस्व राहिले आहे. शिंदे प्रदीर्घ काळ ठाण्यात सेनेचे प्रभारी होते. मात्र त्यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची आगामी वाटचाल कशी असेल अशी अटकळ बांधली जात आहे. अवघ्या काही महिन्यांतच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी निवडणुकींना शिवसेना कशी सामोरे जाते हे पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई