शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवनेरी हापूसला हवे भौगोलिक मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 10:23 IST

शासनस्तरावरही पाठपुरावा : राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसह उपमुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंबा शिवनेरी हापूस म्हणून ओळखला जातो. कोकणच्या हापूसप्रमाणे या आंब्यालाही स्वतंत्र भौगोलिक मानांकन (जीआय) मिळावे यासाठी उत्पादक व शेतकरी संघटनांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एक वर्षापूर्वीच सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. जीआय मानांकनाच्या पाठपुराव्यासाठी शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. कोकणच्या हापूस प्रमाणे   जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याचेही वेगळे वैशिष्ट्य आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात या आंब्याचा हंगाम सुरू होतो. आंबा उत्पादनाला जवळपास ४०० वर्षांची परंपरा असून सद्यस्थितीमध्ये जवळपास एक हजार एकरवर आंबा लागवड सुरू आहे. या आंब्याला स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी हापूसवर संशाेधन करून जीआय मानांकनासाठी जीआय मानांकन कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनीही यासाठी सहकार्य केले आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमाधून यापूर्वी निधीही उपलब्ध करून दिला होता.

५ जूनपासून हंगामाला प्रारंभ    यावर्षी शिवनेरी हापूसचा हंगाम ५ जूनपासून सुरू होणार आहे.     मुंबई बाजार समितीचे संचालक संजय पानसरे, आंबा उत्पादक व महानंदाचे कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.     जीआय मानांकन लवकर प्राप्त व्हावे यासाठी पाठपुरावा करण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSharad Pawarशरद पवारMangoआंबा