शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा बूस्टर डोस; शेअर खरेदीसाठी दिले सहा कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 07:21 IST

नवी मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय साठमारीत रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील एकामागून एक अडथळे दूर करण्याचा सपाटा ...

नवी मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय साठमारीत रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील एकामागून एक अडथळे दूर करण्याचा सपाटा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या द्विसदस्यीय सरकारने चालविला आहे. यानुसार सोमवारी बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारचे शेअर खरेदीसाठी सहा कोटी रुपये वितरित केले आहेत. या बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानला आहे. सरकारने  पहिल्यांदा बुलेट ट्रेनचे शेअर अर्थात समभाग खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. 

या प्रकल्पात केंद्र सरकारचा दहा हजार कोटी अर्थात ५० टक्के तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा प्रत्येकी २५ टक्के अर्थात पाच हजार कोटींची हिस्सेदारी राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी दोन आठवड्यापूर्वी बुलेट  ट्रेनसाठी बीकेसीतील जागा त्वरित रिकामी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तेथे मुंबईतील हे पहिले स्थानक बांधण्यासह पालघर जिल्ह्यातील वसई ते पालघर आणि डहाणू ते तलासरीदरम्यानच्या मार्गातील वृक्षछाटणी, त्यांची वाहतूक, तोडलेल्या वृक्षांचा लिलाव करण्यासह काहींचे पुनर्राेपण करण्याच्या कामाची प्रक्रिया एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल काॅर्पोरेशनने सुरू केली आहे. याशिवाय बुलेट ट्रेनची राज्यातील मार्गिका कशी असावी, ती काेणत्या भागातून जायला हवी, यासाठीच्या हरकती आणि सूचनाही मागविल्या असून त्यांची मुदत २३ जुलै २०२२ रोजी संपली आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे