शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी विजयी

By admin | Updated: January 11, 2016 02:11 IST

नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा राखली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळी या अवघ्या ७६ मतांनी विजयी झाल्या आहेत.

नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा राखली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळी या अवघ्या ७६ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नूतन राऊत यांचा पराभव केला, तर भाजपाच्या उमेदवार सरस्वती पाटील या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान झाले. एकूण ५0.४७ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. यात राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी यांना १८१८ तर काँग्रेसच्या नूतन राऊत यांना १७४२ मते पडली. भाजपाच्या सरस्वती पाटील यांना १0२३ मतांवर समाधान मानावे लागले. शिल्पा कांबळी यांना प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा ७६ मते अधिक पडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांनी नेरूळची ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही जागा राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले होते. त्यानुसार माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रभागात प्रचाराचा धडाका लावला होता. तर राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही जागा खेचून घेण्यासाठी शिवसेना-भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपनेते विजय नाहटा यांनी प्रभागात तळ ठोकला होता. शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने शहरवासीयांत या निवडणुकीच्या निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारीत निसटता विजय संपादित केला. (प्रतिनिधी)