शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पवार साहेब, निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका!

By योगेश पिंगळे | Updated: May 3, 2023 13:18 IST

वाशीत शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भावनिक आवाहन

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी बुधवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते. निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका असे भावनिक आवाहन यावेळी कार्यकर्तांनी केले.

मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पवार यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या वयातही पवार साहेब युवकांना लाजवेल असे काम करतात. पुढील दोन दिवसांत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. शरद पवार हे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांची ऊर्जा असून देशातील सर्व जातीधर्माचे लोक, नागरिक, महिला प्रत्येक घटकाला पवार यांच्या नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि नागरिकांची इच्छा असल्याचे नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी जी.एस.पाटील, विलास हुले, सुनीता देशमुख, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेविका तनुजा मढवी, युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे आदी सर्व सेलचे पदाधीकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNavi Mumbaiनवी मुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस