शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

नवी मुंबईत पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन; 70712 घरांचे होणार सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 20:38 IST

नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा 5853 झाला असून आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दहा विशेष कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.  29 जून ते 5 जुलै दरम्यान या परिसरात विशेष लॉकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.

नवी मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणा-या दहा ठिकाणी  लॉकडाऊन करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या परिसरातील 70712 घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.  या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. 

नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा 5853 झाला असून आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे. मनपा क्षेत्रातील परिस्थितीचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या बैठकीला खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त संजय कुमार, महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये शहरात 34 कंटेनमेंट झोन आहेत. हे झोन रूग्ण सापडलेल्या घर किंवा इमारतीमधील मजल्यापुरते मर्यादित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दहा विशेष कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  

यामध्ये दिवाळे गाव,  करावे गाव, तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर 21, 22, जुहूगाव सेक्टर 11, बोनकोडे गाव, कोपरखैरणे गाव सेक्टर 19, रबाळे गाव व चिंचपाडा परिसराचा समावेश आहे. 29 जून ते 5 जुलै दरम्यान या परिसरात विशेष लॉकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. महानगरपालिका या दहा ठिकाणच्या 70712 घरांमध्ये जावून सर्वेक्षण करणार आहे. कोणीही संशयित रूग्ण सापडल्यास त्याची स्वॅब टेस्ट केली जाणार आहे. 

विशेष कंटेनमेंट झोन व तेथील घरांची संख्या 

विभाग                                   घरांची संख्या

दिवाळे गाव                            3700

करावे गाव                              9400

तुर्भे स्टोअर                             11220

 सेक्टर 21तुर्भे                         6000

 सेक्टर  22  तुर्भे                      8950 

सेक्टर 11 जुहुगाव                    9000

बोनकोडे गाव, सेक्टर 12 खैरणे    5015

सेक्टर 19 कोपरखैरणे गाव          9600

रबाळे गाव                                  2918

चिंचपाडा                                    4900

एकूण                                         70712      

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस