शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार दुकलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:35 IST

कोपरी येथून रंगेहाथ पकडले : गुन्हे शाखेच्या कक्ष एकची कारवाई

नवी मुंबई : दोघा सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या कक्ष एकच्या पथकाने अटक केली आहे. ते कोपरी येथे येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली असून, सव्वा लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.मोहम्मद आरिफ मेहनदी अन्सारी (२८) व हरिश धनराज गिरी (१९) अशी त्यांची नावे आहेत. गिरी हा सानपाडा येथील तर अन्सारी हा दिवा येथील राहणारा आहे. त्यांनी नेरुळमध्ये रिक्षा तर एपीएमसी, कोपरी व वाशी रेल्वेत मोबाइल चोरीचे केलेले चार गुन्हे कबूल केले आहेत.

कोपरी गावात हे दोघे जण चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष एकच्या पथकाला मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उल्हास कदम, राहुल राख, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, भगवान तायडे, दीपक पाटील, अनिल सूर्यवंशी व गणेश तुपे आदीचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी कोपरी परिसरात सापळा रचला असता, रिक्षातून आलेल्या संशयितांची चौकशी केली असता, अन्सारी व गिरी हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते कोपरी येथेही चोरीच्या उद्देशाने आले होते. यानुसार त्यांना अटक केली असता, चौकशीत त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात नेरुळमधील रिक्षा चोरी, एपीएमसी येथील तीन मोबाइल चोरी, कोपरखैरणेतील एक मोबाइल चोरी तसेच वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील एक मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार या गुन्ह्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई