शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दागिने विकण्यासाठी ‘तो’ चोर बनला सोनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:40 IST

बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधाराचे सात वर्षांपासून झवेरी बाजार येथे सोनाराचे दुकान सुरू होते. चोरीचे दागिने सोनाराला निम्म्या किमतीत विकण्याऐवजी स्वत: दुकान उघडून

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधाराचे सात वर्षांपासून झवेरी बाजार येथे सोनाराचे दुकान सुरू होते. चोरीचे दागिने सोनाराला निम्म्या किमतीत विकण्याऐवजी स्वत: दुकान उघडून जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने तो सोनार बनला होता. मात्र, दुसºयांदा देखील त्याचा हा प्रयत्न फसला.बडोदा बँक लुटण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार हाजीद अली सबदर अली मिर्जा बेग ऊर्फ अज्जू ऊर्फ लंगडा (४५) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबई, पुणे यासह राज्याबाहेर घरफोडीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला अनेकदा विविध ठिकाणच्या पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना अपेक्षित यश आले नव्हते. यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही त्याच्याकडून मुद्देमाल जप्त होईल याबाबत साशंकता होती. चेंबूर येथील धाडसी कारवाईत अटक केलेल्या चौघांमध्ये मुख्य सूत्रधारच अज्जू ऊर्फ लंगडा असल्याची कल्पना देखील सुरवातीला पोलिसांना नव्हती. गुन्ह्याशी आपला संबंध नसल्याचे नाटक करून पोलिसांना चकमा देण्याच्या तो प्रयत्नात होता. दरम्यान, उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी, सहायक निरीक्षक उल्हास कदम, पोलीस नाईक प्रकाश साळुंखे, पोलीस शिपाई सूरज जाधव त्याची चौकशी करत होते. चौकशीदरम्यान त्याची पार्श्वभूमी उघड झाल्याने पोलिसांना चकमा देण्याचा त्याचा बेत फसला. यानंतर पोलिसांनी वापरलेल्या क्लृप्तीने अज्जूच्या इतर चार साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे पाच किलो सोने जप्त करण्यात सूरज पाडवी यांच्या पथकाला यश आले. शिवाय अज्जूचे झवेरी बाजार येथे सोन्याचे दुकान असल्याचेही समोर आले.प्रत्येक गुन्ह्यातील चोरीचे सोन्याचे दागिने तो त्याठिकाणी विक्रीसाठी ठेवायचा. इतर सोनाराकडे चोरीचे दागिने विकल्यास बाजारभावापेक्षा निम्मी किंमत मिळते. हा तोटा भरून काढण्यासाठी स्वत:चे सोन्याचे दुकान उघडले होते. यानुसार सुमारे सात वर्षांपासून झवेरी बाजारमध्ये त्याचा हा गोरखधंदा सुरू होता. चार वर्षांपूर्वी त्याची माहिती मिळाल्याने मुंबई पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई देखील केली होती. यानंतरही त्याने कळंबोली येथील स्वत:च्या मालकीचे घर विकून पुन्हा झवेरी बजारमध्ये दुसरे दुकान थाटले होते.हे दुकान भवरसिंग राठोड ऊर्फ गेना प्रसाद सांभाळायचा. अज्जूने राठोडला राजस्थानमधील एका गुन्ह्यात जामीन मिळवून दिल्यापासून दोघे संपर्कात होते. यानुसार भवरसिंग राठोड याने गेना प्रसाद नावाने गाळा भाड्याने घेतला होता. मात्र, गुन्ह्यासाठी ज्यांची मदत घेतली त्यांना रोख देण्यासाठी चोरीचा ऐवज मालेगावमध्ये विकून रक्कम घेतली होती. यादरम्यान चौघेही पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर सापळा रचून केलेल्या कारवाईत त्यांना अटक झाली.

टॅग्स :Crimeगुन्हा