शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंद कारखान्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; इमारती बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:44 IST

अवैध व्यवसायाला चालना, एमआयडीसीसह महापालिकेचेही दुर्लक्ष

नामदेव मोरे नवी मुंबई : ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यांमुळे अवैध व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. खंडरात रूपांतर झालेल्या इमारतींमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचे अड्डे तयार झाले आहेत. मद्य तस्करी करणारे, भंगार विक्रेते व गुन्हेगारांनी या इमारतींमध्ये आश्रय घेतल्याचे उघड झाले असून, बंद कारखान्यांमुळे या परिसरातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ लागला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये बोनसरीमधील बंद कंपनीमध्ये १३ जुलैला तिहेरी हत्याकांड झाले. याठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या भंगार गोडावूनमध्ये ही घटना घडली. याच परिसरातील १० जुलैला भूखंड क्रमांक डी ८५ व ८६ वरील बंद कंपनीमध्ये १ कोटी १४ लाख रुपयांचा मद्यसाठा आढळला. सुरक्षारक्षकाच्या मदतीने कंपनीत साठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसीमध्ये २४ मार्चला साईनाथ ग्रेनाईड या कंपनीमध्ये गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल ७३ लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत केला. पाच महिन्यामध्ये तीन गंभीर गुन्हे घडल्यामुळे बंद कारखान्यांमधील अवैध व्यवसायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिघा ते बेलापूर दरम्यानच्या बंद कारखान्यांची व त्यामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहितीही पोलीस, एमआयडीसी व महापालिका प्रशासनालाही नाही. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या जवळच कांचन इलेक्ट्रिकल कंपनी आहे. १९८३ मध्ये सुरू झालेली कंपनी काही वर्षांपूर्वी बंद झाली आहे. या कंपनीच्या सुरक्षेसाठी काहीही यंत्रणा उपलब्ध नाही. याठिकाणी अमली पदार्थ ओढणारे तरुण दिवसरात्र बसलेले असतात. सोमवारी याठिकाणी जावून पाहणी केली असता एक तरुण अमली पदार्थ ओढत असताना आढळून आला. कंपनीच्या बाहेर पदपथावर भंगार साहित्य ठेवण्यात आले असून भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

इंदिरानगर गणपतीपाडाकडे जाणाºया रोडवर दूध डेरीच्या समोर डी ५२ भूखंडावरील कंपनीही बंद झाली आहे. इमारतीचे बांधकाम अतिधोकादायक स्थितीमध्ये असून तेथे मसाल्याच्या पदार्थांचे पॅकिंग करण्याचा व्यवसाय सुरू आहे. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. बीमलाही तडे गेले आहेत. बोनसरीमधील तिहेरी हत्याकांड झालेल्या कारखान्यामधील भंगार गोडावून बंद करण्यात आले असले तरी अद्याप तेथील सर्व भंगार साहित्य उचलण्यात आलेले नाही. याच परिसरामध्ये डी ५/२ भूखंडावर अग्रवाल ग्रुपने गॅरेज सुरू केले आहे. परंतु कारखान्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साठले असून स्वच्छता ठेवली जात नसल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये फक्त नावापुरतेच सुरक्षारक्षक ठेवले आहेत. अनेक सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळून आले. काही सुरक्षारक्षकांना कंपनीचे नाव, भूखंड क्रमांक व मालकाचे नावही माहिती नाही. बंद कारखान्यांविषयी ठोस भूमिका घेतली नाही तर भविष्यात पुन्हा गंभीर घटना घडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमली पदार्थ ओढणाऱ्यांची दहशतइंदिरानगरमधील एव्हरेस्ट इलेक्ट्रिकल कंपनी बंद असून तेथे सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. पण बंद इमारतीमध्ये व समोरील भूखंडावर अमली पदार्थ ओढणारे तरुण बसलेले असतात. त्यांची दहशत असून सुरक्षारक्षकालाही जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृतपणे गोडाऊन सुरूअनेक बंद कारखान्यांमध्ये अवैधपणे गोडाऊन सुरू आहे. काही ठिकाणी मसाल्याचे पदार्थ ठेवले आहेत. काही कारखान्यांमध्ये भंगाराची दुकाने सुरू केली आहेत. एमआयडीसी प्रशासनाची परवानगी न घेता हे सर्व व्यवसाय सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.धोकादायक इमारतींची यादी नाही

महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांच्या वास्तूही धोकादायक असून त्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. यामुळे अनेकांनी धोकादायक बंद कंपन्यांचा गोडावूनमधून वापर सुरू केला असून त्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.