शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वाढत्या दुर्घटनांमुळे शहराची सुरक्षा गॅसवर, तीन महिन्यांतील तिसरी घटना; स्फोटाचा रहिवासी वसाहतीला हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:50 IST

केमिकल कंपन्यांकडून होणा-या निष्काळजीपणामुळे संपूर्ण औद्योगिक पट्टा गॅसवर आला आहे. मागील तीन महिन्यांत अवघ्या तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात तीन मोठ्या कंपन्यांना भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, औद्योगिक पट्ट्याला लागून असलेल्याच रहिवासी क्षेत्रालाही धोक्याची शक्यता निर्माण होत आहे. रविवारी तुर्भे एमआयडीसीत एका रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर सुरक्षेची ही बाब पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : केमिकल कंपन्यांकडून होणा-या निष्काळजीपणामुळे संपूर्ण औद्योगिक पट्टा गॅसवर आला आहे. मागील तीन महिन्यांत अवघ्या तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात तीन मोठ्या कंपन्यांना भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, औद्योगिक पट्ट्याला लागून असलेल्याच रहिवासी क्षेत्रालाही धोक्याची शक्यता निर्माण होत आहे. रविवारी तुर्भे एमआयडीसीत एका रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर सुरक्षेची ही बाब पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ठाणे, बेलापूर औद्योगिक क्षेत्राची ओळख आहे. सुरुवातीच्या काळात या पट्ट्यातील सुमारे साडेतीन हजार कंपन्यांपैकी बहुतांश रासायनिक कंपन्या होत्या. मात्र, कालांतराने त्यापैकी अनेक कंपन्या बंद पडल्या, तर काही स्थलांतरित झाल्या आहेत. असे असले तरीही सध्या कार्यरत असलेल्या केमिकल कंपन्यांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वारंवार घडणाºया दुर्घटनांवरून स्पष्ट झाले आहे. ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहतींसह जवळच्या तळोजा एमआयडीसीतही सुरक्षिततेबाबत हीच उदासिनता असल्याचे समोर आले आहे. मागील तीन महिन्यांत ठाणे, बेलापूर औद्योगिक पट्ट्यात तीन मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. रविवारी ज्या मोडेप्रो कंपनीला आग लागून स्फोट होत होते, त्याच कंपनीपासून काही अंतरावरील मॅकेमको या कंपनीत तीन महिन्यांपूर्वी भीषण आग लागली होती. त्या ठिकाणीही आगीनंतर स्फोटाची मालिका सुरू होती. तर मागील आठवड्यात महापे येथील स्टॉक होल्डिंग या इमारतीच्या भूमिगत असलेल्या तीन मजल्यांवर आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे पाच दिवस अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. तर टीबीआय लगतच असलेल्या तळोजा एमआयडीसीतील टिकिटार कंपनीमध्ये मार्च महिन्यात भीषण आग लागली होती. औद्योगिक पट्ट्यात आगीच्या अशा अनेक घटना प्रत्येक महिन्याला घडत आहेत. त्यापैकी काही आगी नोव्हेंबर ते मार्च यादरम्यानच लागत असल्याने, त्या लागण्याच्या कारणांबाबत साशंकता आहे. मात्र, आगीच्या अशा घटनांमुळे तिथल्या सुमारे तीन लाख कामगार वर्गासह ठाणे, बेलापूर मार्गाच्या दुसºया बाजूचे रहिवासी क्षेत्र धोक्यात आले आहे.केमिकल कंपन्यांशेजारी पुरेशी मोकळी जागा आवश्यक असतानाही एकामेकाला खेटून सर्व कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये रासायनिक कंपन्यांसह विविध कारखाने आहेत. त्यामुळे एका कंपनीला आग लागल्यास ती लगतच्याही कंपन्यांमध्ये पसरत आहे. यामुळे आगीमध्ये होणाºया वित्तहानीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी बंद कंपन्यांच्या जागी भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहेत. तर बहुतांश कंपन्यांकडून समोरची मोकळी जागाही केमिकलचे ड्रम ठेवण्यासाठी वापरली जात आहे. अशाच प्रकारातून गतवर्षी रबाळे एमआयडीसीमध्ये एका कंपनीला आग लागली होती. अशा घटनांनंतरही सुरक्षेअभावी होणारा हलगर्जीपणा आगीला कारणीभूत ठरत आहे.

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई