शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित, जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांपासून फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:07 IST

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.

मयूर तांबडे पनवेल : पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असल्याचे बोलले जात आहे.शालेय पोषण आहाराचे धान्य आणि इतर साहित्य पुरवठा शाळांना न झाल्याने, तालुक्यातील पहिली ते आठवीमधील हजारो विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५९ शाळा आहेत. काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उधारीवर काम सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत शाळांमधील शालेय पोषण आहार कसातरी चालू होता. सध्या अनेक शाळेत साहित्याचा साठा संपला आहे. ज्या शाळेत तांदळाचा साठा संपला आहे. त्या शाळांना वाटाणा, उसळ, पोषण आहार वाटप करणे अनिवार्य आहे. शाळेतील शिल्लक साहित्य पूर्णत: संपले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व्यवस्थित दिला जातो की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने अधीक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्षच नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. काही मुख्याध्यापक उसनवारीवर साहित्य आणत आहेत; पण पटसंख्या जास्त असल्यामुळे इतके दिवस उधारी ठेवणे कठीण झाले आहे. तीन ते चार महिन्यांपासून अनेक ठिकाणी तांदळाचा पुरवठा केला गेलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे कठीण झाले आहे.पुरवठा कंत्राटदार शाळांना तांदूळ व धान्यादी साहित्यांचा पुरवठा करतात. धान्यादी मालात वाटाणा, मटकी यांचा समावेश होतो. जून महिन्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता. दिवाळीपूर्वी काही शाळांत तांदूळ शिल्लक होते. सध्या अनेक शाळेत तांदळाचा व धान्यादी साहित्याचा साठा संपल्याची माहिती मिळत आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील रु पये खर्च करण्याचे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. काही शाळांत पोषण आहार देणे सुरू आहे, तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यात शालेय पोषण आहार हा नियमित वाटप करण्याचा दंडक आहे. तो न दिल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारवाईच्या भीतीने शिक्षक शालेय पोषण आहाराबाबत काही बोलण्यास तयार होत नाहीत.>शालेय पोषण आहारातील धान्य संपल्यामुळे मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे.>नियोजन नसल्याने अडचणप्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे; पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.>पोषण आहाराचे धान्य आपल्याकडे आलेले नाही. शाळा सुरू झाल्यापासून धान्याचे वाटप झालेले नाही. ज्या शाळांकडे धान्य शिल्लक होते, त्यांच्याकडून ते बाकीच्या शाळांना देणे सुरू आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे ८ दिवसांपूर्वी कळवलेले आहे. संपलेल्या धान्यांचा शाळानिहाय आढावा घेत आहोत.- रंजना चास्कर,गटशिक्षण अधिकारी,पनवेल पंचायत समिती