पनवेल : उमरोली पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेलेल्या सारिका आंब्रे यांचा मृतदेह ९ दिवसांनी १७ जुलै रोजी बेलापूर खाडीत सापडला आहे. ९ जुलै रोजी आदित्य व सारिका आंब्रे हे दाम्पत्य वाहून गेले होते. बॉर्डर सिक्युरिटी कल्याण ग्रुप, एनडीआरएफ पुणे, सिडको अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयामार्फत शोध मोहीम राबविण्यात आली होती. ११ जुलै रोजी आदित्यचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सारिकाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. पनवेल तहसीलतर्फे मृतांच्या नातेवाइकांना चार लाखांची मदत करण्यात आली.
सारिका आंब्रेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 04:54 IST