शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये महास्वच्छता अभियान, दहा दिवसांची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:58 IST

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने १ ते १0 जून दरम्यान हे महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेला देखील सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली.स्वच्छता अभियानाकरिता गटार, नाले तसेच पदपथ स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत पुरविली जाणार आहे. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान उपक्र मात आपला सहभाग असावा यादृष्टीने महास्वच्छता अभियान हा उपक्र म राबविला जाणार असल्याची माहिती परेश ठाकूर यांनी दिली. २ जूनला रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने रात्री ८ वाजता प्रसिद्ध गायक व निवेदक अंशुमन विचारे यांचा ‘चाल तुरू तुरू’ हा गाण्यांचा व किश्श्यांचा संगीतमय हास्यकल्लोळ कार्यक्र म पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष संपल्यामुळे अनेक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्या अनुषंगाने जॉब फेअरचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वाय. टी. देशमुख यांनी दिली.भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.