शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत भाजीपाला फळांची विक्रमी आवक, ग्राहकांची पाठ, २५० ट्रक भाजीपाला शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 03:21 IST

कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी विक्रमी ८४३ ट्रक व टेम्पोंमधून आवक झाली आहे. परंतु ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मालाची विक्री होऊ शकली नाही. जवळपास २५० ट्रक माल विक्रीविना पडून होता. मुंबई, नवी मुंबईमधील फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद असल्याचा परिणामही विक्रीवर झाला आहे.कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते. यामुळे शुक्रवारसाठी व्यापाऱ्यांनीही जादा माल मागविला होता. राज्यातील अनेक मार्केटमध्ये व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनीही मुंबईमध्ये माल विक्रीसाठी पाठविला होता. पहाटेपर्यंत तब्बल ८४३ ट्रक व टेम्पोंमधून भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. मुंबई व नवी मुंबईमधील फेरीवाल्यांवर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेही किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला खरेदीच केला नाही. जवळपास २५० ट्रक मालाची विक्रीच झाली नाही. विक्री न झालेल्या मालाची शनिवारी विक्री केली जाणार आहे. शिल्लक माल ग्राहकांनी घेतला नाही तर शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहक कमी असल्यामुळे काही वस्तूंचे दर कमी झाले आहेत.कांदा, फळे, धान्य व मसाला मार्केटमध्येही दिवसभर चांगली आवक झाली होती. परंतु येथेही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. पाच मार्केटमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत २२११ ट्रक व टेम्पोंची आवक झाली व ७६२ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मंडईमध्ये पाठविण्यात आला.देशभरातून आला मालमुंबई बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक, सातारासह दक्षिणेकडील राज्ये, गुजरात परिसरातून भाजीपाल्याची आवक होत आहे. देशभरातून फळे विक्रीसाठी येत आहेत. अचानक मालाची जास्त आवक वाढल्यामुळे मार्केटमध्ये सकाळी वाहतूककोंडीही झाली होती.गुरुवारी भाजीपाला मार्केट बंद असल्यामुळे शुक्रवारी आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढली व ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे जवळपास २५० ट्रक भाजीपाल्याची विक्री झालेली नाही. पुढील आठवड्यात तीन दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे शनिवारी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभेल.- शंकर पिंगळे,संचालक, भाजीपाला मार्केटतीन दिवस मार्केट बंदमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील आठवड्यामध्ये तीन दिवस बंद राहणार आहे. २२ मार्चला रविवार असल्यामुळे मार्केट बंद राहणार आहे. २३ तारखेला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीमुळे सुट्टी असून २५ मार्चला गुढीपाडव्यामुळे मार्केट बंद राहणार आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई