शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

सिडकोकडून अतिक्रमणमुक्त १३ भूखंडांची विक्री, ३२३ कोटींची तिजोरीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 07:03 IST

सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३२३ कोटी रुपयांची भर पडली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक गतिमान करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांनी घेतला आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३२३ कोटी रुपयांची भर पडली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक गतिमान करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांनी घेतला आहे.सिडकोची मालकी असलेल्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची वेळोवेळी कारवाई केली जाते; परंतु कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या भूखंडांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण उभारले जाते. मागील दोन वर्षांत सिडकोच्या संबंधित विभागाने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रासह पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आदी भागांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत; परंतु अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, अभियांत्रिकी आणि योजना विभागात परस्पर समन्वय नसल्याने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांवर पुन्हा बेकायदा बांधकाम उभारले जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांची तातडीने विक्री करण्याचे निर्देश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसे विशेष अधिकारही या विभागाला प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांची निविदा काढून विक्री केली आहे. यात कोपरखैरणे (६), घणसोली (३), नेरुळ (१) आणि नवीन पनवेल येथील ३ भूखंडांचा समावेश आहे. या भूखंडविक्रीतून सिडकोला ३२३ कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पणन विभागाचे सहायक विकास अधिकारी गणेश झिने यांनी दिली. या भूखंडविक्रीसाठी १० ते २५ जानेवारी या कालावधीत निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला तब्बल १५७ निविदाधारकांनी प्रतिसाद दिला.३० जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी या विभागाने पनवेल विभागातील अतिक्रमणमुक्त केलेल्या सहा भूखंडांची विक्री केली होती. त्यातून सिडकोला २२५ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.नेत्रदीपक कामगिरीसध्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडे अत्यंत कमी कर्मचारी वर्ग आहे. त्या तुलनेत क्षेत्र मोठे आहे. उत्तर आणि दक्षिण नवी मुंबई या दोन्ही क्षेत्रांत या विभागाला अतिक्रमण निर्मूलनाचे काम करावे लागते. हे काम अत्यंत जिकिरीचे व तितकेच त्रासाचे आहे. असे असले तरी दोन वर्षांत या विभागाने नेत्रदीपक कामगिरी करीत, भूमाफियांचे कंबरडे मोडले आहे.मार्केटिंगसाठी विशेष टीमअनधिकृत बांधकाम विभागाने मागील दीड-दोन वर्षांत जवळपास ९० एकर जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. मोकळ्या झालेल्या या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यादृष्टीने पुरेपूर उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने निविदा काढून या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. त्यासाठी अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्केटिंगची विशेष टीम तयार करण्यात आली आहे. यात विकास अधिकारी (पणन) पी.बी.राजपूत, सहायक लेखा अधिकारी बी. आर. तांडेल, सहायक विकास अधिकारी गणेश झिने, श्वेता वाडेकर व क्षेत्र अधिकारी सुनील चिडचाडे आदींचा समावेश आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई