शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये रविवारी कार्यक्रम : सिनेतारकांच्या उपस्थितीत रंगणार ‘सखी सन्मान सोहळा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:56 IST

समाजात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकमत आणि ओरियन मॉलतर्फे आयोजित ‘सखी सन्मान सोहळा’ सिनेतारकांच्या सोबतीने रंगतदार होणार आहे.

पनवेल : समाजात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकमत आणि ओरियन मॉलतर्फे आयोजित ‘सखी सन्मान सोहळा’ सिनेतारकांच्या सोबतीने रंगतदार होणार आहे.समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज महिला कार्यरत असून, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पनवेल महापालिकेतील कुणी अधिकारी असो, वा वडापावची गाडी चालवून मुलीला पायलट बनवणारी माता, कोणी शिक्षण क्षेत्रात दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारी आदर्श शिक्षिका असो वा क्र ीडा, सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाºया महिलांचा या वेळी सन्मान करण्यात येणार आहे.सन्मान सोहळ्याला डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटाच्या निर्मात्या व दिग्दर्शिका समृद्धी पोरे, अभिनेत्री व अँकर अनुपमा ताकमोगे, अभिनेत्री सारिका निलाटकर-नवाथे, मधुरा वेलणकर-साटम उपस्थित राहणार आहेत. या वेळी तिन्ही अभिनेत्रींबरोबर अनुपमा ताकमोगे या संवाद साधणार आहेत. या वेळी प्रेक्षकांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय नृत्याविष्कार पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.ओरियन मॉलचे मंगेश परु ळेकर, मानसी परुळेकर, ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित राहणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सखी सन्मान सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत व ओरियन मॉलतर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट