शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चालू बसचा टायर निघाला, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 03:21 IST

एनएमएमटी प्रशासनाने घणसोली डेपो महालक्ष्मी ट्रान्सपोर्टला चालविण्यासाठी दिला आहे. परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नादुरुस्त बसेस रोडवर चालविल्या जात आहेत.

नवी मुंबई -  एनएमएमटी प्रशासनाने घणसोली डेपो महालक्ष्मी ट्रान्सपोर्टला चालविण्यासाठी दिला आहे. परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नादुरुस्त बसेस रोडवर चालविल्या जात आहेत. बसेस रोडवर बंद पडण्याच्या घटना वाढू लागल्या असून चालू बसचा टायर निघाल्याची घटनाही घडली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला प्रत्येक किलोमीटरला १९ रुपये तोटा होऊ लागला होता. तोटा भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. याचाच भाग म्हणून घणसोली डेपो महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला. डेपोमधील बस दुरुस्ती, बसची साफसफाई करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात आली. सुरवातीच्या काळात ठेकेदाराने चांगले काम केले. परंतु मागील काही महिन्यांपासून निष्काळजीपणामध्ये वाढ होऊ लागली आहे. गत आठवड्यामध्ये उरण परिसरामध्ये चालू बसचा टायर निखळला. बसमधील प्रवासी जखमी झाले नाहीत. देखभाल दुरुस्तीचे काम योग्यप्रकारे केले जात नसल्यानेच अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. यापूर्वीही एका बसचा टायर निखळल्याची घटना घडली होती. गुरूवारी नेरूळमधील समाधान हॉटेलसमोर बस बंद पडली. घणसोली डेपो ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्यानंतर त्यांना नवीन बसेस पुरविण्यात आल्या होत्या. परंतु योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे बसेस बंद पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बसेस वेळापत्रकाप्रमाणे धावत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. बसेसच्या साफसफाईकडेही दुर्लक्ष केले जात आहे. घणसोली आगाराच्या देखभालीकडेही योग्य लक्ष दिले जात नाही. डेपोमध्ये येणाºया-जाणाºया नागरिकांची नोंद ठेवली जात नाही. गुरूवारी बस धुलाईचे काम बंद झाले होते. अनेक वेळा बसेस वेळेवर धुतल्या जात नसल्याच्या तक्रारी प्रवासीही करू लागले आहेत. डेपोमध्ये डिझेल भरण्यासाठी पंप आहे, पण अनेक वेळा डिझेल संपल्यामुळे बसेस रोडमध्ये बंद पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ठेकेदाराकडे पुरेसे चालक नसल्यामुळे उपक्रमाकडील वाहकांकडून बसेस चालविल्या जात होत्या. घणसोली आगारामध्ये बस दुरूस्तीची जबाबदारीही ठेकेदाराची आहे. डेपोत जाऊन पाहणी केली असता दुरूस्तीचे काम करणाºया कर्मचाºयांकडे गणवेश, सेफ्टी बूट नसल्याचे निदर्शनास आले. एनएमएमटीच्या कर्मचाºयांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कार्यशाळेमध्ये ठेकेदाराने एकाही अभियंत्याची देखभालीसाठी नियुक्ती केलेली नाही. एनएमएमटीचा अभियंता देखभालीसाठी ठेवण्यात आला आहे. प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोपही होऊ लागला आहे.ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. बस बंद पडणे, चालू बसचा टायर निघणे अशा गंभीर चुका होवू लागल्या आहेत. बसची अस्वच्छता, मार्गावर बसचे डिझेल संपण्याच्या घटनाही घडल्या असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी केली आहे.- समीर बागवान,परिवहन सदस्यदंडात्मक कारवाईचा बडगाघणसोली डेपोतील ठेकेदाराविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, नियमाप्रमाणे कामकाज होत आहे का याकडे लक्ष दिले जाते. अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई