शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

Russia-Ukraine Conflict: नवी मुंबईतील विद्यार्थी खारकीव्हमध्ये अडकले! अन्नपाण्याची गैरसोय; पालकांच्या चिंतेत भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 09:45 IST

रशिया आणि युक्रेन यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे नवी मुंबईचे विद्यार्थी खारकीव्ह शहरात अडकले आहेत.

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे नवी मुंबईचे नऊ विद्यार्थी युक्रेनच्या खारकीव्ह शहरात अडकले आहेत. सध्या एका हॉस्टेलच्या तळघरात ते सुरक्षित असून, सुमारे १२०० किमी अंतरावर असलेल्या युक्रेनच्या सीमेपर्यंत त्यांना पोहोचायचे आहे. मात्र, बाहेर सुरू असलेला गोळीबार व बॉम्बहल्ल्यामुळे त्यांना बाहेर निघताही येत नसल्याने अन्नपाण्याचाही प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत असून, मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दोन्ही देशाशी असलेल्या संबंधांचा वापर करण्याची मागणी होत आहे.

गेल्या पाच  दिवसांपासून युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू आहे. त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून, नागरिक राहत्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यात  सुमारे चार हजार भारतीयांच्या समावेशाची शक्यता आहे. त्यात नऊ विद्यार्थी नवी मुंबईचे असल्याचे समोर आले आहे. प्रथमा सावंत, संगम सॉ, हिमानी ठाकूर, दक्षा कानडे, लक्ष्मी विश्वकर्मा, सागरिका भाटकर, मिश्रित शर्मा, पूर्वा जायभे व आकांक्षा मल्लिक अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. युद्ध पेटल्यानंतर त्यांना राहत्या हॉटेलच्याच तळघरात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यांना युक्रेनच्या सीमेपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याचे प्रयत्न सैन्याकडून केले जात आहेत. 

मात्र, लपलेल्या ठिकाणावरून बाहेर निघायचे तरी कसे, असा प्रश्नही त्यांना पडला आहे. अशाच प्रकारात खारकीव्ह येथील विद्यार्थ्यांना तुकड्या तुकड्यांनी शहराबाहेर हलवले जात असतानाच मंगळवारी झालेल्या गोळीबारात कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वच विद्यार्थी दहशतीच्या सावटाखाली असल्याची चिंता नेरूळच्या दक्षा कानडे हिचे वडील प्रदीप कानडे यांनी व्यक्त केली आहे. दक्षासोबतच त्याठिकाणी सुमारे दोन हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यात काही जण भारतातील देखील आहेत. इमारतीबाहेर होणारा गोळीबार आणि स्फोटांच्या आवाजामुळे त्यांना सतत धडकी भरत आहे. अशातच अन्न व पाणीपुरवठा देखील अपुरा पडू लागला आहे, तर खारकीव्हमधून धावणाऱ्या रेल्वेत केवळ युक्रेनच्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असल्याने शहराबाहेर निघायचे तरी कसे, असाही प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNavi Mumbaiनवी मुंबई