शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिका प्रशासनाविरोधात सत्ताधारी भाजप आक्रमक, आयुक्तांच्या दालनाबाहेर जमिनीवर बसून केली निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:35 IST

Panvel News : सत्ताधारी भाजप पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी बेशिस्त वागत आहेत. बैठकींना वेळेवर उपस्थित राहत नाहीत.

पनवेल - सत्ताधारी भाजप पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी बेशिस्त वागत आहेत. बैठकींना वेळेवर उपस्थित राहत नाहीत. सत्ताधारी नगरसेवकांना योग्य मान देत नसल्याचा आरोप करीत सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनाबाहेर निदर्शने करण्यात आली.यावेळी उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग अ समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे उपस्थित होते. मंगळवारी सत्ताधारी भाजपच्या वतीने दुपारी ३ वाजता बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पालिकेचे अधिकारी अर्धा तास उशिरा आले. यानंतरच्या बैठकीतदेखील हीच परिस्थिती होती. मासळी मार्केटमधील स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी या परिसरात खोटे उत्तर दिले असल्याचा आरोप सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केला. यापूर्वी विधी विभागाच्या बैठकीतदेखील अधिकारी आम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. महापौरांनादेखील हे अधिकारी मान देत नसून प्रशासनाचा या अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने या बेशिस्त अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आयुक्तांच्या दालनाबाहेर बसलो होतो. नगरसेवकांना हे अधिकारी जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय, असाही प्रश्न यावेळी सभागृह नेते ठाकूर यांनी उपस्थित केला. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनीदेखील अधिकाऱ्यांच्या या वर्तणुकीचा यावेळी निषेध केला.अधिकाऱ्यांची बेशिस्त वर्तणूक वाढत चालली आहे. अधिकारी महापौरांनाही जुमानत नाहीत. वेळेची बंधने पाळत नाहीत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आम्ही आयुक्तांच्या दालनाबाहेर निदर्शने केली.- परेश ठाकूर, सभागृह नेतेयासंदर्भात माझ्याकडे तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यावर समस्या नक्कीच सोडविल्या जातील.- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेलBJPभाजपा