शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पावत्यांमधून लाटले चक्क 10 कोटी; व्यापाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:18 IST

लोखंड, ॲल्यूमिनियम, तांबे व इतर धातूच्या भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने ६० कोटीपेक्षा जास्त किमतीच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या. त्याच्या आधारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला होता.

नवी मुंबई : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने १० कोटी २६ लाख रुपयांचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट्सचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यास अटक केली असून त्याला न्यायालयाने  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे..लोखंड, ॲल्यूमिनियम, तांबे व इतर धातूच्या भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने ६० कोटीपेक्षा जास्त किमतीच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या. त्याच्या आधारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला होता. नवी मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाच्या गैरव्यवहार प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीची चौकशी केली असता  अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने बनावट इनपूट क्रेडिट्स मिळविल्याचे निदर्शनास आले. तब्बल १० कोटी २६ लाखाचे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवून शासनाची फसवणूक केली. संबंधितास ८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली, असे नवी मुंबईचे आयुक्त प्रभात कुमार यांनी दिली आहे.

आतापर्यंत ५० जणांना अटक -नवी मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयने पाच महिन्यात आतापर्यंत ४५० कोटी रुपयांची करचोरी उघडकीस आणली असून २० कोटी रुपयांची वसुली केली आहे. आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे जीएसटीच्या मुंबई विभागाने या कालावधीत ६२५ करचोरी प्रकरणांचा तपास करून ५५०० कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे. आणि ६३० कोटी रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे.

जीएसटी विभागाने करचुकवेगिरी व फसवणूक करणारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. व्यापाऱ्यांनी इनपुट क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या पावत्यांची छाननी केली जात आहे. कारवाईसाठी माहिती विश्लेषणाचा उपयोग केला जात आहे. माहिती विश्लेषण व नेटवर्क विश्लेषण यांचा वापर करून करचुकवेगिरी करणाऱ्यांना शोधून काढले जात आहे. नवी मुंबई कार्यालयाने  २८ जानेवारीला मेट्रो ट्रेनचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अटक करून ८ कोटींची फसवणूक उघडकीस आणली होती. २ फेब्रुवारीला स्टील कंपनीच्या मालकास अटक करून  १० कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आणले होते. संबंधितांवर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७ च्या कलम ६९ (१) अंतर्गत  कारवाई केली जात आहे. कायद्याच्या कलम १३२(१)(बी) आणि (सी) अन्वये गुन्हा दाखल  केला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी