शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

खारफुटी बजावत आहे प्राणवायूची भूमिका, २.८ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन वेगळा करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:58 IST

दिवा ते दिवाळे दरम्यानच्या खाडीकिनारी १४७१ हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल वसले आहे. हे जंगल शहरवासीयांसाठी प्राणवायूची भूमिका बजावत आहे. टेरी संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार हवेतून प्रत्येक वर्षी २.८ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन वेगळा करण्यात यश येत आहे.

- नामदेव मोरे ।नवी मुंबई : दिवा ते दिवाळे दरम्यानच्या खाडीकिनारी १४७१ हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल वसले आहे. हे जंगल शहरवासीयांसाठी प्राणवायूची भूमिका बजावत आहे. टेरी संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार हवेतून प्रत्येक वर्षी २.८ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन वेगळा करण्यात यश येत आहे. खारफुटीचे रक्षण करण्यासाठी महापालिकेनेही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. दिघा ते बेलापूरपर्यंत डोंगररांगा पसरल्या आहेत. अडवली भुतावली परिसरांमध्ये शेकडो एकर वनजमीन आहे. दुसºया बाजूला दिवापासून दिवाळेपर्यंत खाडीकिनारा आहे. खाडीकिनारी तब्बल १४७१ हेक्टर जमिनीवर खारफुटी आहे. १४.७१ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये अ‍ॅव्हिसेनिआ मरीना, सोनेरीटा अल्बा, अ‍ॅन्थॅसिलिसीफोलीस हे खारफुटीतील तण आहेत. मनपा क्षेत्रातील संशोधनावरून परिसरामध्ये ८ जेनेरा, ६ फॅमिली व १ खारफुटी नसलेल्या हॅलोफाइट्स जातीतील आहेत. खारफुटी हा जमीन व समुद्र यांमधील संभाव्य हानी टाळणारा भाग असून, त्याची जमिनीची धूप, वादळ, नैसर्गिक आपत्ती व किनाºयाच्या संरक्षणात फार महत्त्वपूर्ण भूमिका असल्यामुळे शहराच्या भौगोलिक रचनेनुसार उपयुक्त ठरले आहेत. भूपृष्ठीय, प्राणी, मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी व पक्षांच्या प्रजातीचा समावेश असलेल्या सजीव सृष्टींचा प्रजनन व संगोपनाच्या दृष्टीने खारफुटीचा परिसर उपयुक्त असल्याने जैवविविधतेचे जतन करण्यात महत्त्वाचे ठरते.नवी मुंबईच्या आरोग्यासाठी खारफुटी प्राणवायूची भूमिका बजावते. कार्बन वेगळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये वातावरणातील कार्बन एकत्र करून साठविला जातो. या प्रक्रियेअभावी वातावरणात उत्सर्जित होणारा कार्बन टिकून राहतो किंवा या प्रक्रियेमध्ये मानवीय गतविधीमधून वातावरणात उत्सर्जित होणारा कार्बन एकत्रित करून सुरक्षितरीत्या साठविला जातो. वातावरणातील कार्बन वेगळा करण्यासाठी खारफुटी हा सर्वात महत्त्वपूर्ण ठरलेला उपाय आहे. कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात खारफुटीच्या विविधतेमुळे कार्बन वेगळा केला जातो. वातावरणातील कार्बनची अधिक मात्रा यामुळे कमी होते. तसेच जागतिक तापमानवाढीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान असलेल्या हरित वायूच्या प्रमाणातदेखील घट होते. या संदर्भातील अभ्यासावरून असे निदर्शनास येते की, खारफुटीमुळे कार्बन साठविण्याची क्षमता उष्णकटिबंध प्रदेश आणि समशीतोष्ण प्रदेशातील जंगलांपेक्षा आधिक आहे. असे निदर्शनास येते की, खारफुटीमुळे प्रतिवर्ष अंदाजित १८.४ टेरा कार्बन वेगळा केला जातो. टेरी या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार नवी मुंबईचे कार्बन फूट प्रिंटचे प्रमाण २.८ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष असे अनुमान आहे की, सुमारे ०.२६ टक्के कार्बन खारफुटीमुळे दरवर्षी वेगळा केला जात आहे.महापालिकेने केलेल्या उपाययोजना-खारफुटीच्या विनाशाविरोधात करण्यात येणाºया तक्रारींकरिता सर्व प्रभाग कार्यालयांत आपत्कालीन दूरध्वनी सेवा उपलब्ध केली आहे.-अवैध विल्हेवाट व वाहतूक करणाºया वाहनांना प्रतिबंध करण्याकरिता कर्ब स्टोनचा वापर करून सुरक्षा भिंत बांधणे-वाशी, घणसोली व ऐरोली विभागांतील खारफुटी क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यात आली असून त्याजागी कुंपणे उभारण्यात आली आहेत.-खारफुटी क्षेत्रामध्ये डेब्रिजच्या बेकायदेशीर विल्हेवाटीवर देखरेख ठेवण्याकरिता दोन डेब्रिजविरोधी पथके नेमण्यात आली आहेत.भविष्यातकरण्यात येणाºया उपाययोजना-भविष्यात खारफुटी क्षेत्रामध्ये अवैध कृत्यांवर अखंडित देखरेख ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे-शहरात खारफुटी वृक्षांची लागवड करणे-आवश्यक तेथे खारफुटी उद्यान विकसित करण्यात येणार-निसर्ग व पक्षिप्रेमींकरिता खारफुटी क्षेत्रामध्ये पक्षी निरीक्षण मनोरे उभारणे इत्यादी बाबींचे नियोजन नमुंमपाने केले आहे.खारफुटी नष्ट करण्याचेही प्रयत्नखाडीकिनाºयांच्या व पर्यावरणाच्या रक्षणासाठी खारफुटीचे रक्षण होणे आवश्यक आहे. पामबिच रोडसह अनेक ठिकाणी डेब्रिजचा भराव टाकून खारफुटी नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका व वनविभागाने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली असली, तरी खारफुटीवर डेब्रिज टाकणाºयांवर व ती नष्ट करणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरण- प्रेमींकडून केली जात आहे.नवी मुंबईच्या खाडीकिनारी १४७१ हेक्टरवर खारफुटीचे जंगल आहे. यामुळे वातावरणातून कार्बन वेगळा करण्यास मदत होत असून, शहरवासीयांसाठी प्राणवायूची भूमिका बजावत आहे. महापालिकेच्या व वनविभागाच्या माध्यमातून खारफुटी रक्षणासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.- मोहन डगावकर,शहर अभियंता, महापालिका