शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

रोहा - अलिबाग मार्गावरील पूल गेला वाहून

By admin | Updated: September 23, 2016 03:32 IST

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे

रोहा : रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर रोहा - अलिबाग मार्गावरील भातसई व झोळंबेजवळील कोपरा येथील अंदाजे १५ फूट लांबीचा पूल (मोरी) वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहेत. तर रोह्याकडे येणारी वाहतूक रेवदंडा - चणेरा मार्गे वळवली असून २० गावांचा संपर्कतुटला आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. ही घटना गुरु वारी सकाळी १० च्या सुमारास घडली.सानेगाव येथील जेट्टीवरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे झोळंबेजवळील छोटा पूल कमकु वत झाल्यानेप्रवाहात वाहून गेला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. १२ टन वाहतूक क्षमता असलेला हा रस्ता येथे असलेल्या इंडो एनर्जी जेट्टीतील कोळशाच्या ४० ते ४५ टनपेक्षा अधिक तसेच अवजड वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झाला. महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर शासनाने कमकुवत पूल, मोऱ्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. मात्र, या कमकुवत छोट्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. गुरु वारी सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसाने या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर या थांबलेल्या पाण्याने झोळंबे येथील कमकुवत झालेल्या छोट्या पुलाला जोरदार धडक दिल्याने तो वाहून गेला आहे. या घटनेनंतर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. घटनास्थळी रोह्याच्या पी. आय. निशा जाधव, तहसीलदार सुरेश कासेकर आदी अधिकारी तत्काळ धाव घेऊन पाहणी के ली. दुपारी १२.३० पर्यंत पावसाचा जोर कमी झाला असून या मार्गावरु न वाहतूक पुन्हा करण्यास किमान तीन दिवस तरी लागतील, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.गुरु वारी दिवसभरात रोहा येथे १२१ मिमी इतका पाऊस पडल्याने कुंडलिका नदीच्या सर्व उपनद्या व नाले पाण्याने दुथडी भरून वाहत होते. भिरा व दोलवाहल धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. धरणातून पाणी सोडले गेल्यास रोह्यातील रोहा अष्टमीला जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरील पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका अष्टमी बाजूकडून येणाऱ्या एमआयडीसीतील कामगारांना तसेच पुणे - मुंबईकडे जाणाऱ्या एसटी सेवेला बसणार आहे. सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालयाच्या आवारात पाणी साचले होते. दामखाडी गावात जाणाऱ्या रस्त्यावरूनही पाणी वाहत होते.तळा तालुक्यात पावसाचा कहरतळा : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहे. गेली अनेक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्टेंबर महिन्यात पाऊस पडलेला पहावयास मिळत आहे. पावसाने जोर धरल्यामुळे शेतात भातशेती आडवी झालेली पहावयास मिळत आहे. आता उत्तम प्रकारे दाणा भरलेली लोंबी वरती येत असतानाच पावसाने कहर केला आहे. २१ सप्टेंबरला ९७ मि.मी. पावसाची तहसील कार्यालयात नोंद झाली, अशी माहिती तहसील कार्यालयातून उपलब्ध होत आहे. गुरु वारी रोहा-तळा रस्त्यावर तांबडी येथील पुलाजवळ पाणी आल्यामुळे या परिसरातील रोहाकडून कॉलेजला येणारे विद्यार्थी आले नाहीत. मुठवली नदीचे तळा-इंदापूर मार्गावर पाणी आले होते. हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडलेवडखळ/पेण : बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून हेटवणे धरण पुनश्च एकदा भरल्यामुळे पहाटेच्या वेळी धरणाचे सहा दरवाजे आपत्कालीन स्थितीत उघडण्यात आले. भोगावती नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पेण शहराजवळील उत्कर्षनगर, नंदिमाळ नाका, तरणखोप, शंकर नगर परिसरात पुराचे पाणी शिरले, तर नदीवर असणाऱ्या भुंड्या पुलावरून पाणी वाहू लागले. याचबरोबर गडब गावातील १० ते ११ घरांमध्ये पुराचे पाणी रात्रीपासून शिरल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली तर काही घरांमध्ये ३ ते ४ फूट पाणी शिरल्याने फर्निचर, कपडे, तांदूळ असे सामान भिजले तर घराबाहेर असणाऱ्या वस्तू वाहून गेल्या. खारेपाट भागातील वाशी, वढाव, कणे, काळेश्री, भाल आदी गावांमध्ये पाणी शिरल्याने तेथे ग्रामस्थांमध्ये घबराट दिसून येत होती. गडब गावातील पूरस्थितीची पाहणी तहसीलदार वंदना मकू, जि.प. सदस्य संजय जांभळे, तलाठी सर्कल अधिकारी, ग्रा.पं. सदस्यांनी के ली. हेटवणे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आल्याने धरणाचे सर्व गेट खुले करण्यात आले. त्यामधून १८७ घ.न.मी.पर सेकंद पाणी वाहून जात असल्याने नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.