शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या आर्थिक विकास केंद्राचा मार्ग खडतर, एमएमआरडीएचा प्रकल्प, इस्रोच्या परवानगीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 06:34 IST

सदर जागा घेण्याआधी एमएमआरडीएला इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि बीपीसीएल यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे दोन्ही अडसर दूर झाल्यानंतर पनवेलचे हे आर्थिक विकास केंद्र स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे.

 - नारायण जाधवठाणे : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागा संपत आल्याने याच धर्तीवर एमएमआरडीएने पनवेलनजीक हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या ४३१ एकर जागेवर नवे विकासकेंद्र स्थापनेचा निर्णय घेतला आहे. २०१९-२० च्या रेडीरेकनर दरानुसार ९६३ कोटी ३० लाख १३ हजार ६०० रुपयांना ही जागा जैसे थे तत्त्वावर घेण्यास एमएमआरडीएने मान्यता दिली आहे.सदर जागा घेण्याआधी एमएमआरडीएला इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि बीपीसीएल यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे दोन्ही अडसर दूर झाल्यानंतर पनवेलचे हे आर्थिक विकास केंद्र स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे.रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील पराडे, वासंबे, आंबिवली-तुंगारतन आणि पनवेल तालुक्यातील तुराडे, पोसरी, देवळोली, सावळे व दापिवली या गावांतील १०१२ एकर जागेवर एचओसीएल कंपनी होती. मात्र, ती अवसायनात निघाल्यानंतर तिची १०१२ एकर जागा बीपीसीएल आणि २० एकर जागा इस्रोने केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने घेतली.सध्या कंपनीकडे २६८.४५५ एकर जागा शिल्लक आहे. बीपीसीएलने नकार दिल्यास त्यांच्यासाठीची उर्वरित १५५ व ९० एकर जागा नव्या विकास केंद्रासाठी विकत घेण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. ही जागा औद्योगिक असल्याने बीपीसीएल आणि इस्रोच्या परवानगीची गरज भासणार आहे.हे आहे एचओसीएलच्या जागेचे महत्त्वएमएमआरडीएच्या मालकीच्या मुंबईतील बीकेसीतील जागा आता संपत आली आहे. प्राधिकरणाने महानगर प्रदेशात अब्जावधी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे पनवेलच्या या जागेवर विकास केंद्र स्थापून त्याचे भूखंड विकून निधी उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. एचओसीएलची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गासह मुंबई-पुणे दु्रतगती मार्गापासून ती जवळ असून या भागात रिस-मोहपाडा ही नगरपालिका प्रस्तावित आहे. जेएनपीटी बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नैना क्षेत्राला लागून ती आहे. तळोजा, रसायनी या औद्योगिक वसाहती जवळ आहेत. एचओसीएलची पनवेल शहराला लागून निवासी वसाहत असून तिचा एमएमआरडीएच्या आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी वापर करू शकते. शिवाय पराडे, तालुका खालापूर येथील तीन मजली विश्रामगृहात कार्यालय सुरू करणेही सोपे होणार आहे. नियोजित पनवेल-पेण लोकल येथूनच जाणार आहे.

टॅग्स :panvelपनवेल