शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

पनवेलमधील नदीकाठची गावे, नागरी वसाहत असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:59 IST

पनवेल परिसरातून वाहणाऱ्या गाढी नदीमुळे लगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला

- अरूणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल परिसरातून वाहणाऱ्या गाढी नदीमुळे लगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रविवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी लोकवसाहतीत शिरून अनेक घरांचे नुकसान झाले. या ठिकाणी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.पनवेल तालुक्याच्या भौगोलिक अभ्यास करता, येथून गाढी, कासाडी, काळुंद्रे, पाताळगंगा या नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची समजली जाते. माथेरानच्या डोंगरांमधून उगम पावणाºया या नदीलगत नेरे, कोप्रोली, चिपळे, केवाळे, हरी ग्राम, आकुर्ली, सुकापूर, पाली-देवद, विचुंबे याबरोबरच, नवीन पनवेल आणि पनवेल शहरांचा समावेश आहे. माथेरानमध्ये पडणारा पाऊस थेट गाढी नदीत वाहून येतो, तसेच देहरंग धरणातील ओवरफ्लो झालेले पाणीही नदीच्या पात्रात येऊन मिळते. अतिवृष्टीमुळे अनेकदा नदी धोक्याची पातळी ओलांडते. मात्र, अशा वेळी पाटबंधारे विभागाकडून दक्षतेचा इशारा दिला जात नाही. त्याचबरोबर, नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात खडक आहेत. त्यामुळे पाण्याला अडथळा येऊन ते आजूबाजूला पसरते. नदीकिनारी अनेक अनधिकृत बांधकामेही झाली आहेत. त्याचाही पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या अनेक गोष्टी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत.नदीपात्रातील पाणी बाहेर येऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. या सर्व गोष्टीमुळे रविवारी पनवेल शहर जलमय झाले, तसेच नदी लगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शिरवलीच्या डोंगरातून येणारी कासाडी नदी तळोजा, तसेच रोडपाली परिसरातून खाडीला जाऊन मिळते. या नदीलगतसुद्धा गावे आणि नागरी वसाहती आहेत. रविवारी पडघे गावात पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले, तसेच नऊ जण पाण्यात अडकले. स्थानिक युवक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितरीत्या त्यांना बाहेर काढले. ते वेळेवर पोहोचले नसते, तर अनर्थ घडला असता. याशिवाय रोडपाली येथील कातकरवाडी पाणी शिरल्याने आदिवासी कुटुंबांना कळंबोली येथील कालभैरव मंगल कार्यालय स्थलांतरित करावे लागले. इतर गावांमध्ये पावसाचा फटका बसला. पाताळगंगा नदीलगतचीही परिस्थिती वेगळी नव्हती.संरक्षण भिंतीची गरजगाडी आणि कासाडी नदीलगत ज्या गावांमध्ये, तसेच परिसरात पाणी शिरते, तिथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना पाटबंधारे विभागाने करायला हव्यात, तसेच येथे संरक्षण भिंत बांधून संबंधित गावे आणि वसाहती संरक्षित कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण म्हात्रे यांनी केली आहे. पूर आल्यानंतर जागे होण्यापेक्षा तो येऊ नये त्या अनुषंगाने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यांनी सांगितले.रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पनवेल तालुक्यातील नद्यांची पातळी वाढली. त्यानुसार, आजूबाजूच्या गावांना सूचना देण्यात आल्या होत्या. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभाग, महापालिका आणि सिडको या सर्व यंत्रणांना बरोबर घेऊन उपाययोजना केल्या जातील.- अमित सानप,तहसीलदार पनवेल.

टॅग्स :Rainपाऊस