शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा वाढता दर चिंताजनक; दोन महिन्यांत १५० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:52 IST

नवी मुंबई पालिकेच्या उपाययोजना अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रूग्णांच्या दैनंदिन वाढीमुळे आरोग्य सुविधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा घटले आहे. यातच कोरोनामुळे रूग्ण दगावण्याचे प्रमाण सुध्दा चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वांगीण प्रयत्न सुरू आहेत. मात्र मृत्यूदर रोखण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. कारण मागील दोन महिन्यात जवळपास दीडशे जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.नवी मुंबईत कोरोनाची स्थिती भयावह बनली आहे. दररोज हजार ते दीड हजार रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे. यातच ऑक्सिजन बेडची कमतरता आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आदी मुळे अनेक रूग्णांची परवड होत आहे. परिणामी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत मृत्यू दर कमी करण्यात महापालिकेला चांगलेच यश आले होते. विशेष म्हणजे या कालावधीत दैनंदिन मृत्यूचा आकडा शून्यावर आला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा दर वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी ५ ते ९ रूग्ण दगावत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी मृत्यूदर रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सक्षम उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठित केली होती. त्यामुळे मृत्यूदर कमालीचा खाली आला होता. परंतु कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरत असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे ३ जानेवारी २०२१ रोजी एकूण कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १०५९ इतकी होती. मात्र मागील तीन महिन्यात मृतांचा आकडा १२६० इतका झाला आहे. तर १८ फेब्रुवारी २०२१ ते १७ एप्रिल २०२१ या दोन महिन्याच्या कालावधीत जवळपास दीडशे जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांत व त्यांच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठोस पावले उचलण्याची गरज nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वाढत आहे. पूर्वी दिवसाला कोरोनामुळे दोन ते तीन जणांचा मृत्यू होत असे. परंतु आता हा आकडा आता ९पर्यंत पोहोचला आहे. nएकूणच हा मृत्युदर चिंताजनक व भयावह आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे. nनाईक यांनी शनिवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना यासंदर्भात पत्र पाठवून मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस